World Record: असा डेब्यू होणे नाही; एकही धाव न देत घेतल्या 6 विकेट!

World Record: असा डेब्यू होणे नाही; एकही धाव न देत घेतल्या 6 विकेट!

पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड....

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर: क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या बरोबरीने गोलंदाज देखील कमालची कामगिरी करत आहेत. अशीच एक विक्रमी कामगिरी एका गोलंदाजाने केली आहे. ही कामगिरी एका महिला गोलंदाजाने केली आहे. नेपाळच्या अंजली चंदने सोमवारी दक्षिण आशियन टी-20 स्पर्धेत एकही धाव न देता 6 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एखाद्या गोलंदाजाकडून झालेली ही सर्वोत्तम अशी कामगिरी आहे.

दक्षिण आशियन स्पर्धेत नेपाळ विरुद्ध मालदीव या दोन्ही महिला संघातील सामन्यात अंजलीने ही विक्रमी कामगिरी केली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. अंजलीच्या या भेदक गोलंदाजीमुळे नेपाळने मालदीवला 16 धावात गुंडाळले. विजयाचे हे आव्हान नेपाळने 5 चेंडूत कोणतीही विकेट न गमवता पार केले. यात 4 धावा अतिरिक्त होत्या. नेपाळकडून काजल श्रेष्ठने 13 धावा केल्या.

क्रिकेटमध्ये खेळला जातोय ‘अजित पवार’ शॉट, तुम्ही तरी पाहिलात का?

अंजलीने शून्य धावा देत 2.1 षटकात 6 विकेट घेतल्या. या कामगिरीसह तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुष किंवा महिला गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी मालदीवच्या मास एलिसाने चीनविरुद्ध 3 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. तर पुरुषांमध्ये भारताच्या दीपक चाहरने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चाहरने 10 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध 7 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. अंजलीने या दोघांचे विक्रम मागे टाकले. नेपाळच्या अंजलीने 13 चेंडूत 6 विकेट घेतल्या. तर करुणा भंडारीने दोन विकेट घेतल्या. अंजलीने 3 फलंदाजांना बोल्ड केले. एक कॅच तर एकाला स्टंप आऊट केले.

विजयाच्या आधीच केला जल्लोष आणि 4 चेंडूत गमावला सामना

अंजलीच्या या कामगिरीमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचा हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. नेपाळने हा सामना 10 विकेट आणि 115 चेंडू राखून जिंकला. अंजलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत नेपाळ, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका हे चार संघ खेळत आहेत. चार पैकी दोन संघ सुवर्ण पदकसाठी लढतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Dec 2, 2019 05:10 PM IST

ताज्या बातम्या