मुंबई, 23 जानेवारी : ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणाऱ्या तरुण आणि नवोदीत भारतीय टीमची (Team India) सध्या सर्वजण प्रशंसा करत आहेत. वरिष्ठ खेळाडू जखमी झाल्यानंतर भारताच्या तरुण खेळाडूंनी जोरदार खेळ केला. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमनं ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत केलं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयावर उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) जाम खूश झाले आहेत. त्यांनी भारतीय टीममधील सहा तरुण खेळाडूंना महिंद्रा थार SUV देण्याची (Mahindra Thar SUV) घोषणा केली आहे.
कोणत्या खेळाडूंना मिळणार SUV?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना SUV मिळणार आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेनमध्ये दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही SUV देण्याचं महिंद्रा यांनी जाहीर केलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये या सर्वांनीच चांगलं प्रदर्शन केलं होतं. वॉशिंग्टन सुंदरनं पहिल्याच टेस्टमध्ये 62 आणि 22 रन्सची उपयुक्त इनिंग खेळली होती. त्याचबरोबर चार विकेट्स घेतल्या होत्या. 328 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय टीमला शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली होती. गिलनं 148 बॉलमध्ये 91 रन काढत विजयाचा पाया रचला होता.
हे ही वाचा-
Test Series जिंकल्याच्या आनंदात Mohammed Siraj ने स्वत:ला दिलं मोठं Gift
शार्दुल ठाकूरने 67 रन्सची खेळी केली तसंच सात विकेट्स घेतल्या. पहिली टेस्ट खेळणाऱ्या टी. नटराजननं पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या होत्या. नवदीप सैनीला एकही विकेट मिळवण्यात यश मिळालं नाही. मात्र दुखापतग्रस्त असूनही त्यानं पाच ओव्हर बॉलिंग केली. त्याचबरोबर ऋषभ पंतनं विजयी चौकार मारला तेंव्हा तो दुसऱ्या बाजूनं पंतला साथ देत होता.
आनंद महिद्रांनी खेळाडूंचा सन्मान करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 2017 साली सुपर सीरिज जिंकणाऱ्या किदांबी श्रीकांतला एक TUV300 भेट दिली होती. महिंद्रा यांच्या या निर्णयामुळे मोहम्मद सिराजचा आनंद दुप्पट झाला आहे. त्यानं नुकतीच एक BMW कार घेतली आहे. सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सर्वात यशस्वी बॉलर असून त्यानं 3 टेस्टमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.