अमिताभ बच्चन यांनी सांगितली भविष्यातील महिला क्रिकेट टीम, ‘ही’ असेल कॅप्टन?

अमिताभ बच्चन यांनी सांगितली भविष्यातील महिला क्रिकेट टीम, ‘ही’ असेल कॅप्टन?

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) काही दिवसांपूर्वीच मुलगी झाली आहे. या निमित्तानं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भविष्यातील महिला क्रिकेट टीम तयार केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) काही दिवसांपूर्वीच मुलगी झाली आहे. विराटनं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. त्यानंतर सर्वांनीच विराट आणि अनुष्काचं (Anushka) अभिनंदन केलं आहे. या निमित्तानं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी तर थेट भविष्यातील महिला क्रिकेट टीम तयार केली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियातील 13 खेळाडूंचे नावं आहेत. या सर्व खेळाडूंना मुलगी आहे. त्या फोटसोबत ‘भविष्यातील क्रिकेट टीम तयार होत आहे’ असं कॅप्शन त्यांनी दिलंय. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ची मुलगी झिवा (Ziva) या टीमची कॅप्टन होईल का? असा प्रश्नही विचारला आहे.

या यादीमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसह सुरेश रैना, गौतम गंभीर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, ऋद्धीमान साहा, हरभजन सिंह, टी नटराजन आणि उमेश यादव या खेळाडूंची नावं आहेत. या सर्वांना मुली असून त्या देखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला फॅन्सनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.

विराट कोहलीनं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अनुष्का शर्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो फोटो शेअर करुन जानेवारी 2021 मध्ये घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी त्यानं सर्वांना सांगितली होती. त्यानंतर विराट आयपील स्पर्धा खेळण्यासाठी युएईमध्ये रवाना झाला. या दौऱ्यात अनुष्का शर्मा देखील त्याच्याबरोबर होती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टेस्टनंतर विराटनं पितृत्वाची रजा (Paternity leave) घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे भारतीय टीमची कॅप्टनसी करत आहे.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 10:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading