स्मिथची 'ही' कला मनोरंजक, इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथनं अॅशेसमधील पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 07:33 PM IST

स्मिथची 'ही' कला मनोरंजक, इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO

लंडन, 17 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं स्टिव्ह स्मिथच्या शतकांच्या जोरावर विजय मिळवला. बंदीनंतर पुनरागमन करताना केलेल्या जबरदस्त कामगिरीचं क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. त्याच्या फलंदाजीच्या शैलीनं प्रभावित झालेल्या महिला क्रिकेटपटूनं स्मिथचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. स्टीव्ह स्मिथ चेंडू स्टम्प बाहेर जात असेल तर ज्या पद्धतीनं तो फटका न मारता सोडून देतो ते मनोरंजक असल्याचं महिला क्रिकेटपटूनं म्हटलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ त्याच्या खास शैलीमुळं टिकून आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू छेडछाड प्रकरणी त्याच्यावर 12 महिन्यांच्या बंदीची कारवाई झाली होती. त्यानंतर अॅशेस मालिकेतून स्मिथनं पुनरागमन केलं. बर्मिंगहममध्ये झालेल्या कसोटीत त्यानं दोन्ही डावात शतक साजरं केलं. दुसऱ्या कसोटीतही स्मिथनं 63 धावांची खेळी केली. कसोटीत स्मिथच्या 6 हजार 485 धावा झाल्या आहेत.

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला 258 धावांत गुंडाळलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं उपहारापर्यंत 70 धावांत 4 गडी गमावले. पावसामुळे वेळेआधीच उपहाराची घोषणा करण्यात आली. खेळ थांबवला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 37.1 षटकांत 4 बाद 80 धावा झाल्या होत्या.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...