Home /News /sport /

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे करणार टीम इंडियाचं नेतृत्व

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे करणार टीम इंडियाचं नेतृत्व

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार आहे, पण ऍडलेडमधली पहिली टेस्ट मॅच झाल्यानंतर तो भारतात परतणार आहे. यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व करेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार आहे, पण ऍडलेडमधली पहिली टेस्ट मॅच झाल्यानंतर तो भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व करेल. अजिंक्य टेस्ट टीमचा उपकर्णधार असल्यामुळे त्याच्याकडे उरलेल्या 3 टेस्ट मॅचसाठी कर्णधारपद सोपवण्यात येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम 27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरला वनडे मॅच खेळेल. यानंतर 4 डिसेंबर, 6 डिसेंबर आणि 8 डिसेंबरला टी-20 मॅच होतील. 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची ही सीरिज संपल्यानंतर 4 टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर सीरिजला सुरुवात होईल. या सीरिजची पहिली टेस्ट 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये होईल. ऍडलेडमध्ये होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल. परदेशी जमिनीवरची भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच असेल. याआधी भारताने कोलकात्यामध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली डे-नाईट टेस्ट मॅच खेळली होती. ऍडलेडमधली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली भारतात परत येईल. यानंतर 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरी, 7 जानेवारी ते 11 जानेवारीदरम्यान सिडनीमध्ये तिसरी आणि 15 जानेवारी ते 19 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथी टेस्ट होईल. या शेवटच्या तिन्ही टेस्ट मॅचमध्ये रहाणे टीमचं नेतृत्व करेल. याआधी फक्त एकदाच अजिंक्य रहाणेने टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं. 2017 साली विराट कोहलीला दुखापत झाली होती तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला इथल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. रहाणेच्या नेतृत्वात झालेल्या त्या टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला होता. या विजयामुळे भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिजही 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात पुण्यात झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननी पराभव झाला होता. तर बंगळुरूमध्ये झालेली दुसरी टेस्ट भारत 75 रनने जिंकला होता. रांचीमध्ये झालेली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली होती, त्यामुळे चौथ्या टेस्टआधी दोन्ही टीम 1-1 ने बरोबरीत होत्या. पण रहाणेच्या नेतृत्वात भारताने चौथी टेस्ट 8 विकेटने जिंकली आणि सीरिजही खिशात टाकली. या मॅचमध्ये रहाणेने 46 रन आणि नाबाद 38 रनची खेळी केली होती. या मॅचनंतर मात्र अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली नाही. अजिंक्यच्या नेतृत्वात भारतीय टीमने एकूण 6 मॅच खेळल्या, यातल्या 5 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर एक मॅच गमवावी लागली. रहाणेने 1 टेस्ट, 3 वनडे आणि 2 टी-20 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यापैकी एका टी-20 मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. 2015 साली भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. या दौऱ्यात भारताने वनडे सीरिज 3-0 ने जिंकली, तर टी-20 सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या