BCCIचा विराट कोहलीला धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!

BCCIचा विराट कोहलीला धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!

नवा कोच कोण असणार याची चर्चा सुरू असताना BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जुलै: भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने जाहीरात देखील दिली आहे. पण यंदा होणारी कोच आणि सपोर्ट स्टाफची निवड गेल्यावेळी सारखी असणार नाही. नवा कोच कोण असणार याची चर्चा सुरू असताना BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोच निवडीच्या प्रक्रियेतून विराटला बाजूला करण्यात आले आहे. याचाच अर्थ यंदा नवा कोच निवडताना विराटची पसंद किंवा नापसंद विचारत घेतली जाणार नाही.

कोच निवडी संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या कोच निवडीसंदर्भात विराटचे मत विचारात घेतले जाणार नाही. गेल्यावेळी म्हणजेच 2007मध्ये जेव्हा रवी शास्री यांची कोच म्हणून निवड करण्यात आली होती तेव्हा विराटचे मत विचारात घेण्यात आले होते. यावेळी कोचसंदर्भातील अंतिम निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव घेतील. त्यानंतर प्रशासकिय समिती यावर शिक्कामोर्तब करेल. 2017मध्ये जेव्हा कोच असलेले अनिल कुंबळे यांचा कालावधी वाढवण्यात आला नव्हता. तेव्हा देखील विराट कोहलीचे मत विचारात घेतले होते. इतक नव्हे तर विराटच्या म्हणण्यानुसारच कुंबळे यांना पदावरून हटवण्यात आले होते. कोहलीने कुंबळेसोबत काम करण्यास हरकत घेतली होती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, यावेळी कपिल देव नव्या कोच निवडताना विराटचे मत विचारणार नाहीत. इतकच नव्हे तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची निवड देखील सिलेक्टर्स करतील ना की नवा कोच करेल. केल्यावेळी रवी शास्री यांनी स्वत:च सपोर्ट स्टाफची निवड केली होती.

नव्या कोचसाठी बीसीसीआयने मंगळवारी मुख्य कोचसह अन्य सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले होते. यात मुख्य कोच, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फिजिओथेरेपिस्ट, स्ट्रेंथ अॅन्ड कंडीशनिंग कोच आणि प्रशासकीय मॅनेजर या पदांचा समावेश आहे. संबंधित पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 30 जुलै 2019पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत.

किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; तरुणांकडून दगडफेक आणि जाळपोळ

First published: July 18, 2019, 10:41 AM IST

ताज्या बातम्या