मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

नटराजननंतर टीम इंडियातील आणखी एका खेळाडूला मिळालं आनंद महिंद्रांचं स्पेशल गिफ्ट

नटराजननंतर टीम इंडियातील आणखी एका खेळाडूला मिळालं आनंद महिंद्रांचं स्पेशल गिफ्ट

टीम इंडियानं ऑस्ट्रे्लिया दौऱ्यात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात शार्दुल ठाकूरचे योगदान होते.  या कामगिरीबद्दल उद्योगपची आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शार्दुलला महिंद्रा कंपनीची SUV थार गाडी भेट दिली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 एप्रिल : टीम इंडियानं ऑस्ट्रे्लिया दौऱ्यात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) योगदान होते.  या कामगिरीबद्दल उद्योगपची आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शार्दुलला महिंद्रा कंपनीची SUV थार गाडी भेट दिली आहे. ऑस्ट्रेलियातील मालिका जिंकलेल्या 6 खेळाडूंना ही गाडी देण्याची घोषणा महिंद्रा यांनी केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. शार्दुल ठाकूरनं ट्विट करत महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. 'नवी महिंद्रा थार गाडी आली आहे. ही गाडी खरोखरच बेस्ट आहे. मला ही SUV चालवताना खूप  मजा आली. आनंद महिंद्राजी, देशातील तरुणांबद्दल तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी आभार. ' या शब्दात शार्दुलनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शार्दुल ठाकूरनं ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये झुंजार खेळी करत 67 रन काढले होते. तसंच 7 विकेट्स घेतल्या होत्या. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी20 मालिकेत शार्दुलनं भारताकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. New Mahindra Thar has arrived!! @MahindraRise has built an absolute beast & I’m so happy to drive this SUV. A gesture that youth of our nation will look upto. Thank you once again Shri @anandmahindra ji, @pakwakankar ji for recognising our contribution on the tour of Australia. pic.twitter.com/eb69iLrjYb — Shardul Thakur (@imShard) April 1, 2021 शार्दुल ठाकूरपूर्वी टी. नटराजननं देखील महिंद्रा यांचे या भेटीसाठी आभार मानले आहेत. नटराजन याने याबद्दल आनंद महिंद्रा यांना स्वत: सही केलेली गाबा टेस्टमध्ये वापलेली जर्सी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली आहे. 'भारताकडून क्रिकेट खेळणं माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मला मिळालेलं प्रेम अद्भूत आहे. मी आज घरी महिंद्रा थार आणली. आनंदर महिंद्रा सरांचे आभार, ज्यांनी माझ्या क्रिकेट प्रवासाला ओळख दिली आणि मला प्रोत्साहित केलं. मी सही केलेली जर्सी तुम्हाला पाठवत आहे,' असं नटराजन म्हणाला. ( वाचा : World Test Championship : टीम इंडियाला मिळाली सूट, ICC चा मोठा निर्णय ) 29 वर्षांच्या नटराजनने आतापर्यंत भारताकडून 7 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत, यामध्ये 1 टेस्ट, 2 वनडे आणि 4 टी-20 मॅचचा समावेश आहे. नटराजनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 विकेट आहेत.
First published:

Tags: Anand mahindra, Cricket news, India vs Australia, Shardul Thakur

पुढील बातम्या