IPL 2021: इंग्लंडनंतर आणखी एका देशाचे खेळाडू उर्वरित मॅचमधून आऊट!

IPL 2021: इंग्लंडनंतर आणखी एका देशाचे खेळाडू उर्वरित मॅचमधून आऊट!

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) 29 मॅचनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. आता उर्वरित 31 मॅच सप्टेंबरमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) 29 मॅचनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. आता  उर्वरित 31 मॅच सप्टेंबरमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. या मॅचचं वेळापत्रक जाहीर होण्याच्यापूर्वीच अडचणी समोर येत आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) त्यांचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात नसतील असे संकेत दिले आहेत.  त्यापाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडू देखील या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त आहे.

न्यूझीलंडची टीम सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन T20 मॅचची ही सीरिज आहे. ही सीरिज फ्यूचर टूर प्रोग्रॅमचा (FTP) भाग आहे.  ती रद्द किंवा स्थगित केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध सप्टेंबरमध्ये झाला तर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत.

'हे' खेळाडू आयपीएलमधून आऊट

सनरायझर्स हैदराबादचा केन विल्यमसन, मुंबई इंडियन्सचे एडम मिल्ने , ट्रेंट बोल्ट, चेन्नई सुपर किंग्सचा मिचेल सँटनर, कोलकाता नाईट रायडर्सचे लॉकी फर्ग्युसन, टीम सीफर्ट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फिन एलन आणि काईल जेमीसन हे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

'मी धोनीची मदत मिस करतो', टीम इंडियाच्या बॉलरनं सांगितला 2 वर्षांचा अनुभव

इंग्लंडचे खेळाडू देखील बाहेर

आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडचे खेळाडू (England Players) सामील होणार नाहीत, असे संकेत इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऍश्ले जाईल्स यांनी दिले आहेत.आयपीएलच्या उरलेल्या मॅच आणि इंग्लंडच्या ठरलेल्या सीरिज या एकाचवेळी होणार असल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे, असं ऍश्ले जाईल्स यांनी सांगितले आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या