Home /News /sport /

ओ तेरी! ऋषभ पंतनं नवरात्रामध्ये दिल्या भलत्याच शुभेच्छा, फॅन्सनी केली जोरदार धुलाई

ओ तेरी! ऋषभ पंतनं नवरात्रामध्ये दिल्या भलत्याच शुभेच्छा, फॅन्सनी केली जोरदार धुलाई

दिल्लीचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे. या पराभवानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच निराश झाला आहे. या निराशेतून सावरण्यापूर्वीच पंत सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: ऋषभ पंतची (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम यंदा आयपीएल विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीचं प्ले ऑफ मध्ये आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे दिल्लीचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे. या पराभवानंतर ऋषभ पंत चांगलाच निराश झाला आहे. या निराशेतून सावरण्यापूर्वीच पंत सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. ऋषभ पंतनं ट्विटरवर रामनवमीच्या (Rishabh Pant Trolled For Ramnavmi Wishes) शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची फॅन्सनी जोरदार धुलाई केली. ही रामनवमी नाही तर महानवमी आहे, असं एका युझरनं सांगितलं. तर अन्य एकानं त्याची तुलना समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याशी केली. अखिलेश यादव यांनी गुरुवारी महानवमीच्या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. त्यावर भाजप नेत्यांनी त्यांना टोला लगावला होता. शारदीय नवरात्रामध्ये महानवमी असते, रामनवमी ही एप्रिल महिन्यात येते, याची आठवण एकानं करुन दिली. तर पराभवानंतर ऋषभ भाईचं डोकं काम करत नसल्याचा टोला एका फॅननं लगावला आहे. पंतच्या या ट्विटवर युझर्सनी अनेक मीमचा वर्षाव केला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पंतनं भावुक ट्विट केलं होतं. 'काल रात्री हृदयद्रावक असा शेवट होता. पण असामान्य खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानास्पद असे काहीही असू शकत नाही. आम्ही संपूर्ण हंगामात चांगला खेळ दाखवला आणि काही सामन्यात आमची कामगिरी थोडी कमकुवत होती. पण आम्ही आमचे 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला.' असं ट्विट पंतनं केलं होतं. IPL 2021: पंत, अय्यर नाही 'या' खेळाडूला दिल्लीचा कॅप्टन करण्याची गंभीरची सूचना
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Rishabh pant

    पुढील बातम्या