मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: KKR ला तिसरा मोठा धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

IPL 2021: KKR ला तिसरा मोठा धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

कोराना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा टप्पा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसरा मोठा धक्का बसला आहे.

मुंबई, 7 जुलै : कोराना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा टप्पा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसरा मोठा धक्का बसला आहे. कोलकाताचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं (Pat Cummins) स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्यानं कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) उपलब्ध नसेल. त्यापाठोपाठ कोलकाताचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) देखील उर्वरित स्पर्धेतून आऊट झाला आहे.

इंग्लंड दौऱ्यामध्ये गिलला झालेली दुखापत गंभीर असून ती बरी होण्यास किमान 3 महिने लागणार आहेत, याचाच अर्थ तो आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही. असं वृत्त ‘इनसाईड स्पोर्ट्स’नं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. गिल इंग्लंड दौऱ्यातूनही आऊट झालाय. त्यामुळे  टीम इंडियाच्या मॅनेजरनी निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना इंग्लंडला आणखी दोन ओपनर पाठवण्याचा ई-मेल पाठवला आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गिलचा फॉर्म चिंताजनक

शुभमन गिल दुखापतग्रस्त होण्यापूर्वी त्याचा फॉर्म घसरला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याची कामगिरी साधारण झाली होती. इंग्लंड विरुद्धच्या चार टेस्ट मॅचमध्ये गिलनं 19.83 च्या सरासरीनं 119 रन काढले होते. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) त्याला दोन इनिंगमध्ये फक्त 36 रन काढता आले होते.

Happy Birthday Dhoni: टीम इंडियाला कसा मिळाला धोनी? वाचा माहीच्या निवडीची Untold Story

आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी शुभमन गिलनं 7 मॅचमध्ये 18.85 च्या सरासरीनं 132 रन काढले होते. आता दुखापतीमुळे गिल बराच काळ टीमच्या बाहेर राहणार आहे. त्यामुळे त्याला पुनरागमन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IPL 2021, KKR