मुंबई, 4 ऑक्टोबर : रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात आयसीसी (ICC)च्या एका अंपायरला जीव गमवावा लागला आहे. अफगाणिस्तानचे अंपायर बिस्मिल्लाह जन शिनवारी (Bismillah Jan Shinwari)यांचा शनिवारी (3 ऑक्टोबर)ला बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात ही घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात शिनवारी यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातल्या 7 जणांनाही प्राण गमवावे लागले आहेत. 36 वर्षांच्या शिनवारी यांनी 2017 साली गाजी अमानुल्लाह रीजनल वनडेमधून अंपायरिंगला सुरुवात केली. 2017-18 साली शाह अब्दाली 4 दिवसीय स्पर्धा आणि अनेक आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही त्यांनी अंपायरिंग केली.
Shocking news
Seven members of @ACBofficials elite Umpire #BismillahJanShinwari who officiated in many international matches has martyred in a road side bomb blast today in Shinwari district of Nangarhar.
अफगाणिस्तानमधल्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या कार बॉम्बस्फोटात कमीत कमी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. शिनवारी जिल्ह्यातल्या नांगरहर भागामध्ये ही घटना घडली आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशीद खान हा देखील याच जिल्ह्याचा रहिवासी आहे.
नांगरहरमधल्या राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी याची पुष्टी केली आहे. एक बंदुकधारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या कंपाऊडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. पण सुरक्षारक्षकांनी त्याला कंठस्नान घातलं. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.