मुंबई, 7 जुलै: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने लेग स्पिनर राशिद खानच्या (Rashid Khan) टी20 टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) विचार करत बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यंदाचा टी20 वर्ल्ड कप यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे.अफगाणिस्तानने यापूर्वीच सुपर-12 साठी क्वालिफाय केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कॅप्टन होण्यास नकार दिला होता.
‘राशिद खान हा आमचा ग्लोबल चेहरा आहे. त्याचा अनुभव, शानदार प्रदर्शन आणि नेतृत्त्व करण्याची क्षमता याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.’ अशी माहिती अफगाणिस्तान बोर्डानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेली आहे. नजीबुल्लाह जरदानला टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप B मध्ये समावेश आहे. यामध्ये भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या टीमशी त्यांना सामना करावा लागणार आहे. ग्रुपमधील अन्य दोन टीम या पात्रता फेरीतून सुपर-12 साठी दाखल होतील. राशिद खाननं कॅप्टन झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.
I’m a great believer that a captain is as good as his team. It is Afghanistan 🇦🇫 that gave me the name RASHID KHAN & it is my duty now to serve my country & my team. Thank you @ACBofficials for the trust & believing in me. It is a dream journey & my fans support will be the key.
— Rashid Khan (@rashidkhan_19) July 6, 2021
IPL 2021: KKR ला तिसरा मोठा धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट
यापूर्वी नाकारली होती जबाबदारी
राशिद खाननं काही दिवसांपूर्वीच कॅप्टन होण्याची जबाबदारी नाकारली होती. ‘मी व्हाईस कॅप्टन म्हणून ठीक आहे. मी गरज पडली तर कॅप्टनला नेहमी मदत करतो. या पदापासून दूर राहिलेलं माझ्यासाठी चांगलं आहे. एक खेळाडू म्हणून मला चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे. कॅप्टनपेक्षा खेळाडू म्हणून माझी कामगिरी टीमसाठी अधिक महत्त्वाची आहे. मी कॅप्टन झालो तर त्याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो,’ असं मत राशिद खाननं व्यक्त केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket news