मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 क्रिकेटचा आणखी एक बळी! 22 वर्षाच्या फास्ट बॉलरनं घेतला वन-डे क्रिकेटमधून ब्रेक

T20 क्रिकेटचा आणखी एक बळी! 22 वर्षाच्या फास्ट बॉलरनं घेतला वन-डे क्रिकेटमधून ब्रेक

टी20 क्रिकेटवर (T20 Cricket) फोकस करण्यासाठी क्रिकेटच्या अन्य प्रकारातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. या मालिकेत आता आणखी एकाची भर पडली आहे.

टी20 क्रिकेटवर (T20 Cricket) फोकस करण्यासाठी क्रिकेटच्या अन्य प्रकारातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. या मालिकेत आता आणखी एकाची भर पडली आहे.

टी20 क्रिकेटवर (T20 Cricket) फोकस करण्यासाठी क्रिकेटच्या अन्य प्रकारातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. या मालिकेत आता आणखी एकाची भर पडली आहे.

मुंबई, 7 जानेवारी : टी20 क्रिकेटवर (T20 Cricket) फोकस करण्यासाठी क्रिकेटच्या अन्य प्रकारातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. अनेक खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विशेषत: टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत टी20 क्रिकेटवर फोकस करत आहेत. या मालिकेत आता आणखी एकाची भर पडली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अफगाणिस्तानचा (Afghanistan) फास्ट बॉलर नवीन उल हकने (Naveen ul Haq) या प्रकारातून ब्रेक घेतला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी20 वर्ल्ड कप हे त्याच्या ब्रेकचे कारण सांगितले जात आहे.

नवीन हा सध्या फक्त 22 वर्षांचा आहे. त्याने 2016 साली अफगाणिस्तानकडून वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर त्यानं शेवटची वन-डे मॅच जानेवारी महिन्यात खेळली होती. आपण टी20 क्रिकेटसाठी उपलब्ध असू अशी घोषणा त्याने केली आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये नवीननं 5 विकेट्स घेतल्या होत्या.

'क्रिकबझ'नं दिलेल्या वृत्तानुसार नवीननं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला याबाबतची माहिती दिली आहे. वर्ल्ड कपसाठी मानसिक आणि शारीरिक फिट राहण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. नवीननं आजवर 7 वन-डे मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्य आहेत.

नवीननं 13 टी20 इंटरनॅशनलमध्ये 18 विकेट्स घेतल्या असून त्याची सरासरी 18.33 आहे. आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये 42 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर पहिल्या मॅचमध्ये त्याने 68 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

IND vs SA : 'करो वा मरो' टेस्टमध्ये विराट खेळणार का? द्रविडने सांगितले Update

वेस्ट इंडिज विरुद्ध लखनऊमध्ये झालेल्या वन-डेमध्ये त्याने 60 रन देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडमध्ये झालेल्या टी20 ब्लास्टमध्ये त्याने 26 विकेट्स घेतल्या होत्या. नवीन उल हक अमेझॉन वॉरियर्स, लीसेस्टशल, सिल्हेट थंडर या टीमकडून खेळला आहे. अफगाणिस्तानची टीम मार्च महिन्यात भारताविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे.

First published:

Tags: Afghanistan, T20 cricket