Elec-widget

जागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; 140 वर्षानंतर प्रथमच असं घडलं!

जागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; 140 वर्षानंतर प्रथमच असं घडलं!

जागतिक क्रिकेट इतिहासात 9 सप्टेंबर 2019 ही तारीख सुवर्ण अक्षरात लिहली जाणार आहे.

  • Share this:

चट्टग्राम, 09 सप्टेंबर: जागतिक क्रिकेट इतिहासात 9 सप्टेंबर 2019 ही तारीख सुवर्ण अक्षरात लिहली जाणार आहे. क्रिकेटमध्ये रोज कोणी खेळाडू अथवा संघ काही ना काही विक्रम करतच असतात. पण प्रत्येक विक्रम हा ऐतिहासिक असतोच असा नाही. पण आज झालेला विक्रम हा सुवर्ण क्षण असाच म्हणावा लागेल. अफगाणिस्तान(Afghanistan)ने बांगलादेश(Bangladesh)विरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 224 धावांनी विजय मिळवला आणि इतिहास निर्माण केला. अफगाणिस्तानच्या संघाने अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे जी भारत आणि ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघांना देखील करता आली नाही.

बांगलादेशमधील चट्टग्राम मैदानात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान (Rashid Khan)याने बांगलादेशचा अखेरचा फलंदाज सौम्य सरकारला बाद केले आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. या विजयासह अफगाणिस्तानच्या संघाने अशी कामगिरी केली जी 140 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने केली होती. अशा विजय जागतिक क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलिया संघाला करता आला आहे. जे अफगाणिस्तान संघाने केले ते टीम इंडिया(Indian Cricket Team)ला देखील करता आले नाही.

ऑस्ट्रेलियाने 1979मध्ये केला होता पराक्रम

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दुसऱ्यांदा असे झाले आहे की एखाद्या संघाने त्यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. तेव्हा म्हणजे 15 ते 19 मार्च 1877 रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 4 गडी राखून विजय मिळवला होता. तर 1979मध्ये 2 ते 4 जानेवारी दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला होता. याचा अर्थ ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सुरुवातीच्या 3 कसोटी सामन्यांपैकी 2 मध्ये विजय मिळवला होता. आता अफगाणिस्तान संघाने त्यांचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. 14 ते 18 जून दरम्यान बेंगळूरूमध्ये भारताविरुद्धच्या झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा दोनच दिवसात 262 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवला होता.

9 संघांचा विक्रम मागे टाकला...

Loading...

कसोटी क्रिकेटमध्ये दुसरा विजय सर्वात कमी सामन्यात मिळवण्याबाबत अफगाणिस्तानने 9 संघांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कमी सामन्यात दुसरा विजय मिळवण्याबाबत अफगाणिस्तानने तब्बल 9 संघांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये याबाबत बांगलादेशने सर्वाधिक 60 सामन्यात दुसरा विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 55, झिम्बाब्वेने 31, भारताने 30, श्रीलंकेने 20, दक्षिण आफ्रिकेने 13, वेस्ट इंडिजने 12, पाकिस्तानने 9 आणि इंग्लंडने 4 कसोटी सामन्यात दुसरा विजय मिळवला होता.

बांगलादेशला बदलता आला नाही इतिहास

कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशला एक नको असलेला इतिहास बदलता आला नाही. ज्या संघाने बांगलादेशविरुद्ध त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला आहे त्यांच्याविरुद्ध बांगलादेशला कधीच विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्तानचा संघ देखील बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत होता आणि तेव्हा देखील त्यांना विजय मिळवता आला नाही.

VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 9, 2019 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...