• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup, NZ vs AFG: दर 8 बॉलला विकेट घेणारा अफगाणिस्तानचा बॉलर न्यूझीलंडवर पडणार भारी!

T20 World Cup, NZ vs AFG: दर 8 बॉलला विकेट घेणारा अफगाणिस्तानचा बॉलर न्यूझीलंडवर पडणार भारी!

टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळणारी चौथी टीम कोणती होणार याचा निर्णय न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) मॅचनंतर होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर:  टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळणारी चौथी टीम कोणती होणार याचा निर्णय न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) मॅचनंतर होणार आहे. भारतीय फॅन्सचं लक्ष या मॅचवर असून ते सर्व जण अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करत आहे. या मॅचपूर्वी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Suni Gavaskar) यांनी अफगाणिस्तानसाठी ट्रम्प कार्ड ठरु शकणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. गावसकर यांनी 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमान हा  (Mujeeb Ur Rahman) न्यूझीलंडविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकतो, असा दावा केला आहे. 'वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) प्रमाणे मुजीबला खेळणं अवघड आहे. त्याच्याकडं आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे राशिद खानच्या (Rashid Khan) मदतीनं तो न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरु शकतो.' असं मत गावसकरांनी व्यक्त केलं आहे. मुजीबनं आत्तापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच खेळल्या आहेत. या मॅचमधील बॉलिंगनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमची झोप उडवली आहे. त्यानं 2 मॅचमध्ये 5.66 च्या सरासरीनं 6 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी 5 विकेट्स त्यानं स्कॉटलंड विरुद्धच्या एकाच मॅचमध्ये घेतल्या आहे. त्या मॅचमध्ये त्यानं एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्यानं दर 8 बॉल नंतर एक विकेट घेतली आहे. गावसकर यांनी पुढं सांगितलं की, 'मुजीबच्या समावेशामुळे न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तानची बॉलिंग आणखी मजबूत होईल. तो फिट असावा इतकी माझी अपेक्षा आहे. तो खेळला तर अफगाणिस्तानकडं आणखी एक अतिरिक्त स्पिनर असेल. त्यानं राशिद खान आणि मोहम्मद नबीच्या मदतीनं अपेक्षित कामगिरी केली तर टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा बळकट होईल. NZ vs AFG: 'भाई काळजी करू नकोस', निर्णायक मॅचपूर्वी राशिद खाननं दिला अश्विनला दिलासा टीम इंडियासाठी Good News अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याआधी टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे. मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rehman)  पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी तो फिट झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे मुजीब फक्त दोनच मॅच खेळू शकला होता. शनिवारी मुजीबने जिममध्ये व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवरून मुजीब न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी फिट झाल्याचं मानलं जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: