सचिन, गांगुली नाही तर 'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती BCCIने बरखास्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 07:14 PM IST

सचिन, गांगुली नाही तर 'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. त्यामुळं लवकरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नारळ मिळणार आहे.

दरम्यान प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या वतीने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे असणार आहे. तर, अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

याआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...