दोन बॉलमध्ये हॅट्रिकची जादू करणारा 49 वर्षांचा मुंबईकर होणार 'या' स्पर्धेत सहभागी

एखाद्या क्रिकेटपटूनं वयाची पस्तीशी पार केली की त्याच्या रिटायमेंटची चर्चा सुरु होते. मुंबईकर प्रविण तांबे (Pravin Tambe) हा त्याला अपवाद आहे.

एखाद्या क्रिकेटपटूनं वयाची पस्तीशी पार केली की त्याच्या रिटायमेंटची चर्चा सुरु होते. मुंबईकर प्रविण तांबे (Pravin Tambe) हा त्याला अपवाद आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 डिसेंबर : एखाद्या क्रिकेटपटूनं वयाची पस्तीशी पार केली की त्याच्या रिटायमेंटची चर्चा सुरु होते. मुंबईकर प्रविण तांबे (Pravin Tambe) हा त्याला अपवाद आहे. मुंबईकर तांबेचा खेळ त्याच्या चाळीशीनंतर प्रकाशात आला. तरुणांसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी 20 क्रिकेटमध्ये तांबेचा मोठा दबदबा आहे. तांबे वयाच्या चाळीशीनंतर पहिल्यांदा आयपीएल (IPL) खेळला. आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर तो वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) देखील खेळला आहे. सध्या 49 वर्षांचा असणारा तांबे अबु धाबी T-10 लीग (Abu Dhabi T10 League)  स्पर्धेत सहभागी होणार आहे. 26 जानेवारी ते 6 फेब्रवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आठ टीम खेळणार असून या स्पर्धेत सहभागी झालेला तांबे हा एकमेव भारतीय आहे. दिग्गजांचा सहभाग प्रवीण तांबे या लीगमध्ये मराठा अरेबियन्स टीमचा (Maratha Aarabians) सदस्य आहे. पाकिस्तानचा ऑल राऊंडर शोएब मलिकची या टीमचा आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. याच टीमनं 2019 मध्ये स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. अरेबियन्ससह पुणे डेव्हिल्स, बांगला टायगर्स, डेक्कन ग्लॅडिएटर्स, कलंदर्स, दिल्ली बुल्स, नॉर्दन वॉरियर्स आणि टीम अबु धामी या आठ टीम या स्पर्धेत खेळणार आहेत. (हे वाचा-धोनीनं कॅप्टन झाल्यानंतर लगेच निवड समितीच्या सदस्याला दिलं होतं मोठं आश्वासन!) ख्रिस गेल, आंद्रे रसेल, सुनिल नरीन, कायरन पोलार्ड, शाहिद आफ्रिदी आणि थिसारा परेरा हे T20 स्टारही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तांबेचा चमत्कार प्रवीण तांबेनं वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमकडून सर्वप्रथम आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला मुंबईकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तांबे टी 20 मधील एक यशस्वी बॉलर मानला जातो. त्यानं 64 टी 20 मॅचमध्ये 6.92 च्या इकॉनॉमी रेटनं 70 विकेट्स घेतल्या आहेत. (हे वाच-'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये होतो भेदभाव,' गावसकरांचा आरोप) तांबेनं 2014 मध्ये चमकदार कामगिरीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तांबेने अवघ्या दोन वैध बॉलमध्ये हॅट्रिक घेण्याची किमया केली होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) या सामन्यातील 16 व्या ओव्हरमध्ये तांबेने पहिला चेंडू वाइड फेकला. मात्र तो चेंडू टोलवण्यासाठी पुढे आलेला मनोज तिवारी यष्टीचीत झाला. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर तांबेने यूसुफ पठाण आणि रयान टेन याला बाद करत हॅट्रिक साजरी केली.
    Published by:News18 Desk
    First published: