मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

6,6,6,6,6,6,6,6,6! आबुधाबीमध्ये Gayle Storm, फक्त 22 बॉलमध्ये 84 धावा

6,6,6,6,6,6,6,6,6! आबुधाबीमध्ये Gayle Storm, फक्त 22 बॉलमध्ये 84 धावा

आबुधाबीमध्ये (Abu Dhabi) सुरु असलेल्या T10 लीगमध्ये (T10 League) वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेलच्या (Chris Gayle) वादळात (Gayle Strom) मराठा अरेबियन्सची (Maratha Arabians) वाताहत झाली.

  • Published by:  News18 Desk

आबुधाबी, 4 फेब्रुवारी :  आबुधाबीमध्ये (Abu Dhabi) सुरु असलेल्या T10 लीगमध्ये (T10 League) वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेलच्या (Chris Gayle) वादळात (Gayle Strom) मराठा अरेबियन्सची (Maratha Arabians) वाताहत झाली.  टीम आबुधाबी विरुद्ध मराठा अरेबियन्स (Team Abu Dhabi vs Maratha Arabians) या मॅचमध्ये गेलनं फक्त 12 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं.

गेलनं 22 बॉलमध्ये 6 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीनं नाबाद 84 रन केले. या वादळी खेळीत त्यानं 6 फोर आणि 9 सिक्सची बरसात केली. गेलच्या या खेळीच्या जोरावर टीम आबुधाबीनं 98  रनचं आव्हान तब्बल 27 बॉल राखत पूर्ण केलं.

गेलचा नवा विक्रम

गेलनं या वादळी खेळीच्या दरम्यान सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणाऱ्या दोन दिग्गजांची बरोबरी केली. भारताच्या युवराज सिंहनं (Yuvraj Singh) 2007 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड  विरुद्ध 12 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तानच्या अहमद शेहजादनं T10 लीगमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

ख्रिस गेलनं मैदानाच्या चारही बाजूनं फटकेबाजी करताना मराठा अरेबियन्सच्या सर्व बॉलर्सची धुलाई केली. सोमपाल कामी हा सर्वात महागडा बॉलर ठरला. त्यानं एका ओव्हरमध्ये 27 रन दिले. एम. हुसेनच्या एका ओव्हरमध्ये 22 रन निघाले. यामिन अहमजादीनं 18 तर इशान मल्होत्रा आणि मारुफ मर्चंटच्या एका ओव्हरमध्ये प्रत्येकी 15 रन निघाले.

(हे वाचा- #IndiaTogether लढ्यात सचिनही मैदानात; परदेशी सेलेब्रिटींना सुनावले खडे बोल)

यापूर्वी मराठा अरेबियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 10 ओव्हरमध्ये 4 आऊट 97 पर्यंत मजल मारली. मराठा अरेबियन्सकडून आलिशान शरफूनं सर्वात जास्त 27 रन काढले. तर मोहम्मद हाफिजनं 20 रन काढले. पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिक 15 रन काढून नाबाद राहिला. T10 लीगचा विचार करता 98 रनचं आव्हान कमी होतं. गेलच्या वादळापुढे ते अगदीच तोकडं ठरलं.

First published:

Tags: Cricket