जोहान्सबर्ग, 7 मे : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान डीव्हिलियर्सनंही याबाबतची इच्छा व्यक्त केली होती. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांनी डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध जून महिन्यात होणाऱ्या टी-20 मालिकेत डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेची टीम 2 टेस्ट आणि 5 टी 20 मॅचच्या मालिकेसाठी जून महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे, अशी घोषणा स्मिथ यांनी केली. त्यावेळी त्यांनी डीव्हिलियर्स पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल असं मत व्यक्त केलं. डीव्हिलियर्ससह ख्रिस मॉरीस आणि इम्रान ताहीर देखील आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक अजून जाहीर होणे बाकी आहे. डीव्हिलियर्स, मॉरीस आणि ताहीरचं टीममध्ये पुनरागमन होईल, अशी आपल्याला आशा आहे, असं स्मिथनं सांगितलं. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या संचालकांच्या या वक्तव्यामुळे डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाची आता केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे, असं मानलं जात आहे.
World Test Championship : IPL नंतर टीम इंडियाला बदलावा लागणार प्लॅन
डीव्हिलियर्स तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीनं 8765 रन केले आहेत. यामध्ये 22 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. डीव्हिलियर्सनं 228 वन-डेमध्ये 53 पेक्षा जास्त सरासरीनं 22 शतक आणि 53 अर्धशतकांच्या मदतीनं 8765 रन केले आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 1762 रन काढले आहेत.
क्रिकेट विश्वात 'मिस्टर 360' म्हणून प्रसिद्ध असलेला डीव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं तर आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.