Home /News /sport /

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये भूकंप, डिव्हिलियर्सवर खेळाडूंशी भेदभाव केल्याचा ठपका

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये भूकंप, डिव्हिलियर्सवर खेळाडूंशी भेदभाव केल्याचा ठपका

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून (South Africa Cricket) एक धक्कादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्सवर (AB De Villiers) अश्वेत खेळाडूंशी भेदभाव केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून (South Africa Cricket) एक धक्कादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्सवर (AB  De Villiers) अश्वेत खेळाडूंशी भेदभाव केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आफ्रिकेतील सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण आयोगाने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात डिव्हिलियर्ससह माजी कॅप्टन आणि बोर्डाचे विद्यमान संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) तसेच सध्याचा टीमचा हेड कोच मार्क बाऊचरवरही हा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. काय आहे प्रकरण? या आयोगाचे प्रमुख डुमिसा एन यांच्या अंतिम रिपोर्टमध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील बड्या व्यक्तींना अश्वेत खेळाडूंबद्दल पूर्वग्रह ठेवून वागणूक दिल्याच्या प्रकरणात दोषी असल्याचे म्हंटले आहे. हा रिपोर्ट जाहीर होताच डिव्हिलियर्सनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. 'मी क्रिकटमध्ये सर्वांना समान संधी मिळावी याची काळजी घेण्यासाठी क्रिकेट साऊथ आफ्रिकाचा सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्माण आयोगाच्या उद्देशांना पाठिंबा देतो. पण, मी नेहमीच माझ्या करिअरमध्ये प्रामाणिकपणे टीमच्या हितासाठी आवश्यक मत मांडले आहे. कोणत्याही वांशिक आधारावर नाही, हेच सत्य आहे.' असे ट्विट डिव्हिलियर्सने केले आहे. 'क्रिकइन्फो'नं दिलेल्या वृत्तानुसार या आयोगाने दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील वांशिक आणि लैंगिक आधारावरील प्रकरणांच्या निवारणासाठी स्थायी लोकपाल समितीची शिफारस केली आहे. मार्क बाऊचर आणि माजी स्पिनर पॉल एडम्स यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघड झाले होते. एडम्सला सहकारी खेळाडूंनी वांशिक आधारावर टोपणनाव दिले होते, अशी तक्रार त्यानी केली होती. Ashes Series वर कोरोनाचे सावट, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन दुसऱ्या टेस्टमधून आऊट या आयोगाने मार्क बाऊचरने 2002 साली निवृत्ती घेतल्यानंतर थामी सोलेकिले याची निवड न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच हे प्रकरण वांशिक भेदभावाचे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa

    पुढील बातम्या