मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PAK vs WI: वेस्ट इंडिजच्या टीममध्ये Corona Blast, पाकिस्तान विरुद्धची मालिका धोक्यात

PAK vs WI: वेस्ट इंडिजच्या टीममध्ये Corona Blast, पाकिस्तान विरुद्धची मालिका धोक्यात

पाकिस्तान दौऱ्यावर मोठ्या कालावधीनंतर गेलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला (West Indies Cricket Team) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर मोठ्या कालावधीनंतर गेलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला (West Indies Cricket Team) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर मोठ्या कालावधीनंतर गेलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला (West Indies Cricket Team) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसला आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : पाकिस्तान दौऱ्यावर मोठ्या कालावधीनंतर गेलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला (West Indies Cricket Team) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका बसला आहे. वेस्ट इंडिजची निम्मी टीम सध्या कोरोनाग्रस्त असल्याने उर्वरित मालिका संकटात सापडली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यातील तिसरा टी20 सामना आज (गुरुवार) होणार असून त्यानंतर 18 डिसेंबरपासून तीन वन-डे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार टीममधील आणखी 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विकेट किपर बॅटर शाही होप (Shai Hope), स्पिनर अकिल हुसेल (Akil Hosein) आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस ( Justin Greaves) हे तीन खेळाडू नुकत्याच घेतलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर वेस्ट टीमचे असिस्टंट कोच आणि फिजिशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे.

या सर्व खेळाडूंना वेस्ट इंडिज टीममधील अन्य सदस्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. त्यांना 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांतर त्यांची PCR टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना परत टीममध्ये दाखल होता येईल.

वेस्ट इंडिजच्या टीममधील कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या आता 6 झाली आहे. त्याचबरोबर डेव्हॉन थॉमल हा खेळाडू पहिल्या टी20 सामन्याच्यावेळी जखमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असून या बैठकीत उर्वरित मालिकेचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये भूकंप, डिव्हिलियर्सवर खेळाडूंशी भेदभाव केल्याचा ठपका

यापूर्वी वेस्ट इंडिज टीममधील  फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell), ऑल राऊंडर रोस्टन चेज (Rosten Chase) आणि काईल मेयर्स (Kyle Mayers) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर गैर कोचिंग स्टाफमधील एक सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कराचीमध्ये झालेल्या कोरोना चाचणीत हे सर्व जण पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे या चौघांचेही लसीकरण झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Covid-19, Cricket news, Pakistan, West indies