पोलॉकसोबतचा हा 4 वर्षांचा मुलगा, आता आहे दिग्गज क्रिकेटपटू

पोलॉकसोबतचा हा 4 वर्षांचा मुलगा, आता आहे दिग्गज क्रिकेटपटू

देशासाठी क्रिकेट खेळणं आणि आपल्या आवडत्या खेळाडूसोबत फोटो काढण्याची स्वप्न प्रत्येक क्रिकेट रसिक बघतो. सगळ्यांचीच ही स्वप्न सत्यात उतरत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची मात्र ही दोन्ही स्वप्न पूर्ण झाली आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : देशासाठी क्रिकेट खेळणं आणि आपल्या आवडत्या खेळाडूसोबत फोटो काढण्याची स्वप्न प्रत्येक क्रिकेट रसिक बघतो. सगळ्यांचीच ही स्वप्न सत्यात उतरत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची मात्र ही दोन्ही स्वप्न पूर्ण झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4 वर्षांचा मार्नस या फोटोमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शेन पोलॉक (Shane Pollock)सोबत दिसत आहे. क्रिकेट संख्याशास्त्रज्ञ मोहनदास मेनन यांनी हा फोटो ट्विट केला आहे. 13 एप्रिल 1997 साली ब्लोमफॉनटेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत वनडे मॅच झाली, या मॅचआधी हा फोटो काढण्यात आला. तुझ्यासोबत लवकरच करार करावा लागेल, असं त्यावेळचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक बॉब वूल्मर म्हणाले होते. दक्षिण आफ्रिकन टीम सराव करत असताना 4 वर्षांचा लाबुशेन तिकडे येऊन उभा राहिला होता, अशी आठवण मोहनदास मेनन यांनी हा फोटो शेयर करताना सांगितली.

आपल्या छोट्या कारकिर्दीमध्येच लाबुशेन याने नाव कमावलं आहे. भारताविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही लाबुशेन फॉर्ममध्ये होता. या 4 टेस्टच्या 8 इनिंगमध्ये लाबुशेनने 53.25 च्या सरासरीने 426 रन केले, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या टेस्ट सीरिजमधला लाबुशेन सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू ठरला.

18 टेस्ट मॅचच्या कारकिर्दीमध्ये लाबुशेनने 60.81 च्या सरासरीने 1,885 रन केले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 शतकं आणि 10 अर्धशतकं आहेत. 215 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. तर 13 वनडेमध्ये 39.42 च्या सरासरीने त्याने 473 रन केले आहेत, यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

Published by: Shreyas
First published: January 25, 2021, 8:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या