• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • डिविलियर्सची World Cup खेळण्याची ऑफर का फेटाळली? अखेर कारण झालं उघड

डिविलियर्सची World Cup खेळण्याची ऑफर का फेटाळली? अखेर कारण झालं उघड

आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट बोर्ड (Cricket South Africa) वादात सापडले आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर: आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट बोर्ड वादात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत 16 मॅचमध्ये 633 रन करणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन फाफ ड्यु प्लेसी (Faf du Plessis) याचा वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आलेल्या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या टीम निवडीवर टीका होत आहे. अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर (Cricket South Africa) टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपपूर्वी (Cricket World Cup 2019) या क्रिकेट बोर्डाचा एक निर्णय वादग्रस्त ठरला होता. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सची (AB de Villiers) निवृत्ती  मागं घेऊन दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेला वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा होती. त्यानं तसा प्रस्तावही दक्षिण आफ्रिका बोर्डाला दिला होता. मात्र बोर्डानं तो प्रस्ताव फेटाळला. या निर्णयानंतर दोन वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष लिंडा जोंडी (Linda Zondi ) यांनी त्याचं कारण सांगितलं आहे. काय आहे कारण? जोंडी यांनी दक्षिण आफ्रिकेतील सोशल जस्टीस अँड नेशन बिल्डिंग (SJN) मधील सुनावणीच्या दरम्यान या प्रकरणाचा खुलासा केला. 'इसएपीएन क्रिकइन्फो' च्या वृत्तानुसार जोंडी यांनी सांगितलं की, 'माझ्याकडं कॅप्टन (फाफ ड्यु प्लेसी) आला होती. डिविलियर्सचा टीममध्ये समावेश करण्याची त्याची इच्छा होती. मी त्याला नकार दिला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप दरम्यान तुझी गरज भासेल असं मी डिविलियर्सला सांगितलं होतं. तुला काही सीरिज खेळायच्या नसतील तर आपण ते मॅनेज करू असा प्रस्तावही मी त्याला दिला होता. T20 World Cup: 3 टीमनी केला मुख्य फेरीत प्रवेश आता फक्त 1 जागा शिल्लक वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा कर असं मी एबीडीला सांगितलं होतं. पण त्याने नकार दिला. मला लगेच निवृत्त व्हायचं आहे, असं मला एबीडीनं सांगितलं. त्यानंतर फाफ माझ्याकडं आला आणि त्यानं डिविलियर्सला परत यायचं आहे, असं सांगितलं. पण मी त्याला नकार दिला. कारण त्यामुळे टीममधील अन्य खेळाडूंवर अन्याय झाला असता, असं मला वाटलं.'  असे जोंडी यांनी स्पष्ट केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: