सचिनचा आदर्श पण फलंदाजी धोनीसारखी, 16 व्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये खेळणार

सचिनचा आदर्श पण फलंदाजी धोनीसारखी, 16 व्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये खेळणार

वयाच्या 16 व्या वर्षी संघात निवड झाल्याचं समजल्यानंतर बसलेल्या सुखद धक्क्यातून अजुन सावरता आलेलं नसल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

  • Share this:

कोलकाता, 13 जानेवारी : आयसीसी टी20 महिला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये शेफाली आणि ऋचा यांची वर्णी लागली आहे. सिलिगुडीची असलेल्या ऋचा घोषने 16 व्या वर्षी वर्ल्ड कपच्या संघात स्थान पटकावलं आहे. भारताच्या महिला संघासोबत ती पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहे. तिचे वडील बंगालचे अंशकालीन पच मानवेंद्र घोष यांना पाहूनच ऋचाने वयाच्या पाचव्या वर्षी बॅट हातात धरली होती. चॅलेंजर ट्रॉफीत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं.

ऋचा म्हणाली की, मी कधी विचारही केला नव्हता की इतक्या लवकर असं काही होईल. यावर विश्वास ठेवणं कठिण आहे आणि अजुन मी या सुखद धक्क्यातून सावरले नाही. माझे पहिले आदर्श माझे वडील आहेत ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकले. त्यानंतर सचिन तेंडुलकर माझे नेहमीच आदर्श राहतील.

फलंदाजी करताना फटकेबाजी आणि षटकार मारण्याची चर्चा होते तेव्हा ऋचा धोनीचे नाव घेते. धोनीची मोठी चाहती असलेली ऋचा म्हणते की, धोनी ज्या पद्धतीने षटकार मारतो ते मला आवडतं आणि मी सुद्धा असा प्रयत्न करते. गोलंदाज कोणीही असो जोपर्यत तुमच्या हातात बॅट असते तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकता.

बंगालच्या संघात ऋचाला झूलन गोस्वामीची साथ मिळते. तर भारताचा पुरुष संघाचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहाकडूनही तिला नेहमीच मार्गदर्शन होते. दोघेही एकाच शहरातील आहेत. त्याबद्दल झूलन आणि ऋद्धिमान साहा यांचेही आभार मानले आहेत.

ऋचाला बंगालच्या सिनियर टीमने 2012-13 मध्ये शिबिरात बोलावलं होतं. तिच्या प्रशिक्षकांनी म्हटलं की, कोणत्याही प्रशिक्षकासाठी ऋचा संघात असणं चांगलंच आहे. ती प्रतिभासंपन्न अशी खेळाडू आहे. अजुन लहान असल्यानं पुढची वाटचाल तिला ठरवावी लागेल. ती तडाखेबाज फलंदाजीसाठी आणि चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जाते.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ- स्मृति मांधना (उप कर्णधार), हरमनप्रीत कौर (कप्तान), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरूंधती रॉय.

क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा', आता 15व्या वर्षी खेळणार वर्ल्ड कप

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 13, 2020 10:15 AM IST

ताज्या बातम्या