न्यूझीलंडमध्ये पाकिस्तान टीमने वाढवला कोरोना, तब्बल इतके टक्के खेळाडू पॉझिटिव्ह

न्यूझीलंडमध्ये पाकिस्तान टीमने वाढवला कोरोना, तब्बल इतके टक्के खेळाडू पॉझिटिव्ह

पाकिस्तानची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) च्या दौऱ्यावर गेली आहे, पण या दौऱ्यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानचे खेळाडू न्यूझीलंडमध्ये असलेल्या कोरोना (Corona Virus) च्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत

  • Share this:

वेलिंग्टन, 29 नोव्हेंबर : पाकिस्तानची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) च्या दौऱ्यावर गेली आहे, पण या दौऱ्यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानचे खेळाडू न्यूझीलंडमध्ये असलेल्या कोरोना (Corona Virus) च्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत, त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या टीमला शेवटचा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या टीमने नियम पाळले नाहीत, तर त्यांना पुन्हा घरी पाठवलं जाईल, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ठणकावून सांगितलं आहे.

न्यूझीलंडमध्ये असलेले पाकिस्तानचे तब्बल 7 क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे न्यूझीलंडमधला कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढला आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या कोरोनाचे 69 रुग्ण आहेत, यापैकी 7 रुग्ण म्हणजे जवळपास 10 टक्के रुग्ण हे पाकिस्तानी क्रिकेटपटूच आहेत. शनिवारी न्यूझीलंडमध्ये चार नवे कोरोनाचे रुग्ण सापडले, यापैकी 3 परदेशातून आलेले, तर एक पाकिस्तानी खेळाडू होता.

आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये 2,047 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 12,66,944 कोरोना टेस्ट झाल्या आहेत. देशात सध्या कोविड-19 अलर्ट लेव्हल-1 असून नागरिकांना भेटण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.

न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याबद्दल तिथल्या पंतप्रधान जेसिंडा आरडर्न यांचं जगभरात कौतुक होत आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पाकिस्तानी खेळाडूंकडून नियम धाब्यावर

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना 14 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये खेळाडूंनी एकमेकांना न भेटणं आणि फक्त स्वत:च्या रूमवर राहणं अपेक्षित आहे. पण पाकिस्तानचे खेळाडू हॉटेलमध्ये एकमेकांना भेटून गप्पा मारत आहेत, तसंच जेवणही एकत्र करत आहेत, असं हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये समोर आलं. यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला इशारा दिला. आता कोरोनाचे नियम मोडले गेले तर दौरा रद्द करून पाकिस्तानी टीमला घरी पाठवलं जाईल, असा सज्जड दम न्यूझीलंडने दिला आहे.

Published by: Shreyas
First published: November 29, 2020, 11:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading