मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Pakistan: पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमच्या वडीलांना अश्रू अनावर, VIDEO VIRAL

India vs Pakistan: पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमच्या वडीलांना अश्रू अनावर, VIDEO VIRAL

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमचे (Babar Azam) वडील चांगलेच इमोशनल झाले होते.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 25 ऑक्टोबर: कोणत्याही क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्ताननं टीम इंडियाचा पराभव केला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. भारतीय टीमनं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी 152 रनची पार्टनरशिप करत पाकिस्तानला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयानंतर बाबर आझमचे वडील चांगलेच इमोशनल झाले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

घरातच क्रिकेट

पंजाबी कुटुंबातील बाबर आझमच्या घरातच क्रिकेट आहे. कमरान अकमल, उमर अकमल हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू बाबरचे भाऊ आहे. बाबरनं वयाच्या 13 व्या वर्षापासून क्रिकेट गांभीर्यानं खेळण्यास सुरुवात केली. लाहोरच्या कर्नल गडाफी स्टेडियममध्ये तो बॉल बॉय म्हणूनही काम केले आहे. 2015 साली वयाच्या 21 व्या वर्षी बाबरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही.

विराट कोहलीशी तुलना

बाबर आझम गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. वन-डे आणि टी20 मध्ये वेगानं रन बनवणाऱ्या बाबर आझमची तुलना टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी (Virat Kohli) केली जात आहे. ही तुलना अगदीच चुकीची नसल्याचं बाबरनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये त्यानं दाखवून दिलं.

भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. बाबरनं या विजयानंतर संपूर्ण देशाचे आभार मानले आहेत.

बाबर आझमचे वडील देखील ही मॅच पाहण्यासाठी दुबईतील स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनाही या मॅचनंतर अश्रू आवरले नाहीत.

टीम इंडियाची पुढची मॅच आता 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवणे टीम इंडियाला आवश्यक आहे.

India vs Pakistan: टीम इंडियाच्या पराभवानं डिप्रेशन आलंय? 'हे' 5 उपाय करतील तुम्हाला नॉर्मल

First published:

Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup