Home /News /sport /

IPL 2021: रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही KKR पराभूत, CSK चा सलग तिसरा विजय

IPL 2021: रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही KKR पराभूत, CSK चा सलग तिसरा विजय

आंद्रे रसेल (Andre Russell) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 18 रननं पराभव झाला.

    मुंबई, 21 एप्रिल: आंद्रे रसेल (Andre Russell) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 18 रननं पराभव झाला. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 220 असा विशाल स्कोअर केला होता.  221 चा पाठलाग करताना केकेआरची अवस्था 5 आऊट 31 अशी झाली होती. त्यानंतर रसेल कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार केला. त्यांचा हा प्रयत्न अखेर कमी पडला. केकेआरचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव असून चेन्नईचा सलग तिसरा विजय आहे. आंद्रे रसेलनं 5 आऊट 31 अशी अवस्था असताना मैदानात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यानं फक्त 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं 54 रन काढले. रसेलला दिनेश कार्तिकनं 40 रन काढत भक्कम साथ दिली. ही जोडी आऊट झाल्यानंतर चेन्नई आरामात जिंकेल असं वाटत होतं. त्याचवेळी पॅट कमिन्सनं जोरदार फटकेबाजी केली. कमिन्सनं सॅम करनच्या एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीनं 30 रन काढले. कमिन्सनं 33 बॉलमध्ये नाबाद 65 रन काढले. वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा हे केकेआरचे शेवटचे दोन बॅट्समन कमिन्सला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाले आणि केकेआरचा पराभव झाला. SRH जिंकताच 'मिस्ट्री गर्ल'ची कळी खुलली, हसऱ्या चेहऱ्यावर Social Media फिदा यापूर्वी  चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf du Plessis) सर्वात जास्त नाबाद 95 रन काढले. 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं त्यानं ही खेळी केली.ऋतुराज गायकवाड (Rutruraj Gaikwad) याने आक्रमक 64 रन करत सीएसकेला दमदार सुरुवात करुन दिली.  त्यानं 33 बॉलमध्येच 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं.  तो अखेर 42 बॉलमध्ये 64 रन काढून आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या महेंद्रसिंह धोनीनं 8 बॉलमध्ये 17 रन काढले. तर रवींद्र जडेजा 6 रन काढून नाबाद राहिला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या