IPL 2021: प्रितीच्या सरदारचा मिस्ट्री बॉल, पृथ्वी झाला क्लीन बोल्ड, VIDEO

IPL 2021: प्रितीच्या सरदारचा मिस्ट्री बॉल, पृथ्वी झाला क्लीन बोल्ड, VIDEO

पंजाब किंग्सचा (PBKS) ऑफ स्पिनर हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) याच्यासाठी ही आयपीएल स्पर्धा चांगली ठरत आहे. हरप्रीतनं दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये एका अप्रतिम बॉलवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला आऊट केलं.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे: प्रिती झिंटाच्या (Priti Zinta) पंजाब किंग्सचा (PBKS) ऑफ स्पिनर हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) याच्यासाठी ही आयपीएल स्पर्धा चांगली ठरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये (PBKS vs RCB) त्यानं बंगळुरुच्या तीन दिग्गजांना फक्त 7 बॉलमध्ये आऊट केलं होतं. त्याच्या या कामगिरीमुळे पंजबानं बंगळुरुचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये (Delhi Capitals) पंजाबचा पराभव झाला. या पराभवातही हरप्रीतनं चांगली कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधलं.

दिल्लीचा तरुण बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये (DC vs KKR) पृथ्वीनं शिवम मावीच्या एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले होते. पृथ्वीनं कोलकाता विरुद्ध फक्त 41 बॉलमध्ये 82 रन काढले होते.

पृथ्वीनं पंजाब विरुद्धही आक्रमक सुरुवात केली होती.  त्यानं 21 बॉलमध्येच 3 फोर आणि 3 सिक्ससह 39 रन काढले होते. पृथ्वीची पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येकडं वाटचाल सुरु होती. त्यावेळी अचानक हरप्रीतनं त्याला ब्रेक लावला. सातव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हरप्रीतनं पृथ्वीला बोल्ड केलं. लेगस्टंपच्या दिशेनं जाऊन बॉल खेळण्याच्या पृथ्वीच्या सवयीचा हरप्रीतनं फायदा उचलला. त्यानं ऑफ स्टंपवर बॉल टाकला. पृथ्वीला त्याचा बॉल समजलाच नाही, आणि तो बोल्ड झाला.

पाहा : हरप्रीत ब्रारचा अप्रतिम बॉल, पृथ्वी शॉ झाला बोल्ड

हरप्रीतनं यापूर्वी बंगळुरु विरुद्ध  विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) या तिघांना आऊट केलं होतं.

पंजाब किंग्जची या आयपीएलमधील वाटचाल अडखळत सुरु आहे. त्यांनी आठपैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवलाय. पंजाबला प्ले ऑफ गाठण्यासाठी पुढील प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे, त्या परिस्थितीमध्ये प्रिती झिंटाच्या या नव्या सरदारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 5:03 PM IST

ताज्या बातम्या