0,0,0,0,0,0,0,0,0,0: 10 च्या 10 फलंदाज शून्यावर बाद, प्रतिस्पर्ध्यांसमोर 4 धावांचं आव्हान

एका सामन्यात एकाच संघातील10 फलंदाजांचा शून्यावर त्रिफळा उडण्याची क्रिकेटच्या इतिहासातील अनोखी घटना.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 10:11 PM IST

0,0,0,0,0,0,0,0,0,0: 10 च्या 10 फलंदाज शून्यावर बाद, प्रतिस्पर्ध्यांसमोर 4 धावांचं आव्हान

वायनाड, 16 मे : क्रिकेटमध्ये कधी काय घ़डेल याचा नेम नाही. मोठमोठ्या धावसंख्येच्या विक्रमाप्रमाणे निच्चांकी धावसंख्येचा नको असलेला विक्रमही नोंदवला जातो. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात कधीच असा सामना तुम्ही पाहिला नसेल. एका सामन्यात सर्वच्या सर्व फलंदाज शून्यावर बाद झाल्याची घटना घडली आहे.

देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या वायनाड मतदारसंघातील मुलींच्या अंडर 19 संघाचा सामना कसारागोडच्या संघाशी झाला. बुधवारी झालेल्या या सामन्यात दहा फलंदाज शून्यावर त्रिफळाचित झाले. यासह इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.

कसारागोडच्या संघाने चार धावा केल्या त्यासुद्धा गोलंदाजांनी अवांतर धावा दिल्याने. वायनाडच्या फलंदाजांनी एका षटकात 5 धावांचे आव्हान पूर्ण करत सामना 10 विकेटनं जिंकला. दरम्यान, नाणेफेक जिंकून कसारागोडची कर्णधार एस अक्षताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र तिच्या या निर्णयानंतर फलंदाजांनी केलेली कामगिरी निराशाजनक अशीच होती. सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या दोन षटकांत संघर्ष केला मात्र एकही धाव त्यांना घेता आली नाही. त्यानंतर पुढच्या दोन षटकांत सर्व फलंदाज तंबूत परतले.

वाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...