मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 आधी रसेलचं वादळ, पाकिस्तानी बॉलर धक्क्यात

IPL 2021 आधी रसेलचं वादळ, पाकिस्तानी बॉलर धक्क्यात

आंद्रे रसेलची वादळी खेळी

आंद्रे रसेलची वादळी खेळी

आयपीएल 2021 (IPL 2021) आधी कोलकात्याचा (KKR) विस्फोटक खेळाडू आंद्रे रसेलने (Andre Russell) तडाखा दाखवला आहे. सीपीएल 2021 (CPL 2021) च्या तिसऱ्या मॅचमध्ये जमैका तैलवाहने सेन्ट लुसिया किंग्सला 125 रनने पराभूत केलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 28 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) आधी कोलकात्याचा (KKR) विस्फोटक खेळाडू आंद्रे रसेलने (Andre Russell) तडाखा दाखवला आहे. सीपीएल 2021 (CPL 2021) च्या तिसऱ्या मॅचमध्ये जमैका तैलवाहने सेन्ट लुसिया किंग्सला 125 रनने पराभूत केलं. जमैकाने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रन केले. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रसेलने फक्त 14 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने नाबाद 50 रन केले. सीपीएल इतिहासातलं हे सगळ्यात जलद अर्धशतक आहे. रसेलने दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीचा सगळ्यात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला. ड्युमिनीने 2019 च्या सीपीएलमध्ये 15 बॉल खेळून अर्धशतक केलं होतं.

जमैकाने दिलेल्या 256 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना सेन्ट लुसियाचा 135 रनवर ऑल आऊट झाला. सेन्ट लुसियाने टॉस जिंकून जमैकाला पहिल्यांदा बॅटिंगला पाठवलं. यानंतर चाडविक वॉल्टन आणि कीनर लुईस यांच्या जोडीने 36 बॉलमध्येच 81 रनची पार्टनरशीप केली. लुईसने 21 बॉलमध्ये 2 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 48 रन केले. तर वॉल्टन 29 बॉलमध्ये 47 रनची खेळी करून आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला पाकिस्तानचा बॅट्समन हैदर अलीने 32 बॉलमध्ये 45 रन केले. कर्णधार रोवमैन पॉवलनेही 26 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली. रसेल जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा फक्त 17 बॉलचा खेळ शिल्लक होता.

एका ओव्हरमध्ये ठोकले 32 रन

सेन्ट लुसियाकडून 19 वी ओव्हर टाकण्यासाठी पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाझ (Wahab Riaz) आला. या ओव्हरमध्ये रसेलने 4 सिक्स आणि एका फोरच्या मदतीने तब्बल 32 रन काढले. रियाजने आपल्या 3 ओव्हरमध्ये 61 रन दिले.

19 वी ओव्हर संपली तेव्हा रसेल 8 बॉलमध्ये 30 रनवर खेळत होता. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी ओबेड मेकॉय आला. मेकॉयच्या ओव्हरमध्ये रसेलने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. इनिंगच्या अकेरच्या बॉलवर फोर मारून रसेलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

First published:

Tags: IPL 2021, KKR