मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CPL 2021 : बॉल न बघताच बॅट्समनने मारला भन्नाट सिक्स, पोलार्डही बघत बसला, VIDEO

CPL 2021 : बॉल न बघताच बॅट्समनने मारला भन्नाट सिक्स, पोलार्डही बघत बसला, VIDEO

क्रिकेटपटूचा नो लूक सिक्स

क्रिकेटपटूचा नो लूक सिक्स

टी-20 क्रिकेटमुळे (T20 Cricket) खेळाची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली आहे. जलद रन करण्याच्या नादात नवे शॉट्स मारण्याचे प्रयोग केले जात आहेत. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL 2021) असंच काही बघायला मिळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : टी-20 क्रिकेटमुळे (T20 Cricket) खेळाची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली आहे. जलद रन करण्याच्या नादात नवे शॉट्स मारण्याचे प्रयोग केले जात आहेत. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL 2021) असंच काही बघायला मिळत आहे. सेन्ट लुसिया किंग्सचा बॅट्समन आंद्रे फ्लेचरने (Andre Fletcher) मारलेला सिक्स पाहून क्रिकेट चाहते आणि मैदानतले खेळाडूही बघतच बसले. फ्लेचरच्या या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये आंद्रे फ्लेचरने हा भन्नाट शॉट मारला. त्याने या सामन्यात 28 रन केले. त्रिनबागो नाईट रायडर्स बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची (Shahrukh Khan) टीम आहे.

या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. सेन्ट लुसियासाठी फ्लेचर आणि रहकीम कॉर्नवॉल बॅटिंगसाठी आले. मॅचची पाचवी ओव्हर टाकण्यासाठी श्रीलंकेचा फास्ट बॉलर इसरू उडाना आला, पण फ्लेचरने त्याला लागोपाठ दोन बॉलला सिक्स मारल्या. पहिली सिक्स त्याने डीप मिड विकेटच्या दिशेने लगावली. फ्लेचरने दुसरा सिक्स पण याच दिशेने मारला, पण त्याने हा शॉट बॉलकडे न बघताच टोलावला. फूटबॉलमध्ये असे शॉट अनेक वेळा बघायला मिळतात, पण क्रिकेटमध्ये असं खूप कमी वेळा होतं.

फ्लेचरच्या या नो लूक शॉटवर चाहते चांगलेच खूश झाले. सेन्ट लुसियाने या मॅचमध्ये कमी स्कोअर केला, तरी त्यांचा 5 रनने विजय झाला. मॅचमध्ये पहिले बॅटिंग करताना सेन्ट लुसियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन केले. फ्लेचरच्या 28 रनशिवाय रोस्टन चेसने 30 आणि टीम डेव्हिडने 3 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 43 रन केले.

त्रिनबागोकडून रवी रामपॉलने तीन विकेट मिळवल्या. विजयासाठी 158 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या त्रिनबागोला 3 विकेट गमावून 152 रनच करता आल्या. कॉलिन मुनरो आणि टीम सायफर्ट प्रत्येकी 40 रनवर नाबाद राहिले, पण तरीही टीमला विजय मिळवता आला नाही.

First published: