लंडन, 06 ऑगस्ट : कोरोनामुळे याआधी सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्रा क्रीडाविश्वही पुर्वपदावर येत आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यानंतर आता इंग्लंड-आयर्लंड (England vs Ireland) यांच्यात एकदिवसीय मालिका झाली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये बॉब विलीज ट्रॉफी (Bob Willis Trophy) खेळली जात आहे. काउंटी क्रिकेटचा सामना प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सामन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका जबरदस्त यॉर्कर चेंडूचा आहे.
बॉब विलीज ट्रॉफीमध्ये चेस्टर-ले-स्ट्रीटमध्ये डरहम आणि यॉर्कशायर यांच्यात एक सामना खेळला गेला होता. या सामन्यात डरहम संघाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय सपशेल अयशस्वी ठरला. डरहमने केवळ 103 धावा केल्या. तर याचा यॉर्कशायर संघाने 199 धावा केल्या. दुसऱ्या डावात डरहमर संघाने 266 धावा केल्या. मात्र या सामन्यात मॅथ्यू फिशरचा यॉर्कर गाजला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वाचा-रोहित नाही तर 'हा' फलंदाज आहे खरा रनमशीन! IPLमध्ये सर्वात जास्त धावांचा रेकॉर्ड
Durham have just lost 8 for 59 😳
It included this beaut from @9M_Fisher!
Follow #BobWillisTrophy LIVE ➡️ https://t.co/Ia9VHZlMTa pic.twitter.com/Gn99eXpl29
— County Championship (@CountyChamp) August 3, 2020
वाचा-धोनीसह चेन्नई सुपर किंग्ज संघातील 'हे' खेळाडू IPLमधून घेऊ शकतात निवृत्ती!
दुसऱ्या डावात डरहमचा संघ 221-4 अशा स्थितीत असता मॅथ्यू फिशरने आपल्या शानदार यॉर्करने जॅक बर्नहॅमला बोल्ड केले. फिशरनं टाकलेला यॉर्कर चेंडू थेट स्टम्पला लागला, हा चेंडू आल्यानंतर बर्नहैम जमिनीवर पडले, तर स्टम्प हवेत होते.
वाचा-टेरेसवर टेनिस खेळून जगाला हैराण करणाऱ्या मुलींना फेडररनं दिलं सरप्राइझ
हा व्हि़डीओ काउंटी चॅम्पियनशीप या ऑफिशिअल पेजवरून शेअर करण्यात आला आहे.