Home /News /sport /

लाबुशेनचा बॉल पोटावर आदळला, Ben Stokes मैदानातच कोसळला, VIDEO

लाबुशेनचा बॉल पोटावर आदळला, Ben Stokes मैदानातच कोसळला, VIDEO

बेन स्टोक्सची (Ben Stokes) इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रेकनंतर स्टोक्स मैदानात पुनरागमन करत आहे, सध्या तो काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळत आहे.

    लंडन, 13 मे : बेन स्टोक्सची (Ben Stokes) इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रेकनंतर स्टोक्स मैदानात पुनरागमन करत आहे, सध्या तो काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळत आहे. मागच्या सामन्यात स्टोक्सने शतक केलं, तसंच त्याने एका ओव्हरमध्ये 5 सिक्सही ठोकल्या. डरहमकडून खेळणाऱ्या स्टोक्सला ग्लेमॉर्गनच्या मार्नस लाबुशेनने जोरदार धक्का दिला. चार दिवसीय मॅचच्या पहिल्या दिवशी डरहमचा 311 रनवर ऑल आऊट झाला. बेन स्टोक्स 33 रनवर असताना लाबुशेनचा बाऊन्सर स्टोक्सच्या शरिरावर आपटला, यानंतर स्टोक्स मैदानातच कोसळला. सुदैवाने स्टोक्सला दुखापत झाली नाही आणि थोडा वेळाने तो परत बॅटिंगसाठी उभा राहिला. 110 बॉलमध्ये त्याने 82 रन केले, यात 8 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. न्यूझीलंडविरुद्ध सीरिज इंग्लंड पुढच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध (England vs New Zealand)  3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पहिली टेस्ट 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणार आहे. ही मॅच स्टोक्सची कर्णधार म्हणून पहिलीच टेस्ट असेल. ऍशेसमधल्या खराब कामगिरीनंतर जो रूटने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. तसंच आता इंग्लंडला ब्रेण्डन मॅक्कलमच्या रुपात नवा कोचही मिळाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातही एक टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे भारताच्या इंग्लंड दौऱ्यातली पाचवी टेस्ट होऊ शकली नव्हती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. स्टोक्ससोबतच चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेट खेळत आहे. पुजाराने 4 मॅचमध्ये 4 शतकं केली आहेत, या 2 द्विशतकांचाही समावेश आहे. या फॉर्ममुळे पुजाराने पुन्हा टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या