शेन वॉर्नच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची पुनरावृत्ती, VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

शेन वॉर्नच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची पुनरावृत्ती, VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने क्रिकेटला अलविदा करून बराच काळ झाला आहे, पण आजही त्याच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची (Ball of the Century) आजही चर्चा होते.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने क्रिकेटला अलविदा करून बराच काळ झाला आहे, पण आजही त्याच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची (Ball of the Century) आजही चर्चा होते. 28 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डमध्ये ऍशेस सीरिजच्या टेस्टदरम्यान वॉर्नने माईक गेटिंगला (Mike Gatting) हा जादूई बॉल टाकला होता. या बॉलची पुनरावृत्ती होईल, असं कोणालाही वाटलं नसेल, पण इंग्लिंश काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये (English County Championship 2021) असाच एक बॉल पडला आहे.

इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला 24 वर्षांचा लेग स्पिनर मॅट पार्किनसन (Matt Parkinson) याने लॅन्कशायरकडून (Lancashire)  खेळताना नॉर्थम्पटनशायरच्या (Northampshire) एडम रॉसिंग्टननला (Adam Rossington)  शेन वॉर्नसारखाच बॉल टाकला आणि बोल्ड केलं. पार्किनसनने टाकलेला या बॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वॉर्नने 1993 सालच्या ऍशेस टेस्टच्या आपल्या पहिल्या ओव्हरमध्येच हा बॉल टाकला होता. सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम 289 रनवर ऑलआऊट झाली. मग बॅटिंगला आलेले इंग्लंडचे ओपनर ग्रॅहेम गूच आणि माइक अथर्टन यांच्यात 71 रनची पार्टनरशीप झाली.

अथर्टनची विकेट गेल्यानंतर माईक गेटिंग बॅटिंगसाठी उतरले, तेव्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधार एलन बॉर्डर यांनी शेन वॉर्नच्या हातात बॉल दिला. ही वॉर्नची मॅचमधली पहिलीच ओव्हर होती. गेटिंग 4 रनवर खेळत असताना वॉर्नने लेग स्टम्पवर बॉल टाकला आणि हा बॉल वळून ऑफ स्टम्पच्या बेल्सला लागला. वॉर्नचा हा बॉल पाहून सगळेच हैराण झाले, पुढे याच बॉलची, 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून इतिहासात नोंद झाली.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 10:12 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या