Coronavirus : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाशी लढा देणं अधिक गरजेचं असल्याचे मत व्यवस्थापकांकडून व्यक्त केले जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 1 एप्रिल : जगभरात कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्याचा विचार करता 2020 च्या चॅम्पियनशिप विम्बल्डन (wimbledon championship 2020) रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाचही ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

टेनिस प्रेमीमध्ये wimbledon championship ची मोठी क्रेझ असते. ते आवर्जुन या स्पर्धेची वाट पाहत असतात. मात्र यंदा जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या (Covid - 19) कहरामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बुधवारी ऑल इंग्लंड क्लब यांनी आपात्कालीन बैठक बोलावली होती. यामध्ये विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

29 जून ते 12 जुलै या कालावधीत ही स्पर्धा लंडन येथे  होणार होती. मात्र आता 134 वी विम्बल्डन स्पर्धा 28 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत होणार आहे.

संबंधित - IPLबाबात सर्वात मोठी बातमी, एप्रिल नाही तर 'या' महिन्यांत होणार स्पर्धा

ऑल इंग्लंड क्लब (AELTC) संचालक इन हॅविट यांनी सांगितले की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोना व्हायरसमुळे विम्बल्डन रद्द करण्यात आली आहे. सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटाशी कसं लढायचं हा विचार करायला हवा आणि विम्बल्डनच्या स्त्रोताचा उपयोग कोरोनाच्या लढ्यात कसा करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.’

Wimbledon website वर दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी विम्बल्डन पब्लिक बॅलेटची तिकीटे काढली आहे त्यांना पैसे परत केले जातील.

संबंधित - Real Champion! कोरोनाशी लढण्यासाठी 15 वर्षाच्या शूटरने केली 30000 ची मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading