Home /News /sport /

कनिका कपूरमुळे 15 क्रिकेटपटूंचाही जीव आला होता धोक्यात, हेल्थ रिपोर्टमध्ये 'ही' माहिती आली समोर

कनिका कपूरमुळे 15 क्रिकेटपटूंचाही जीव आला होता धोक्यात, हेल्थ रिपोर्टमध्ये 'ही' माहिती आली समोर

कोरोनाची लागण झालेली बॉलिवूड सिंगर ज्या हॉटेलात थांबली होती त्याच हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही थांबले होते.

    नवी दिल्ली, 02 एप्रिल : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 47 हजार लोकांना जीव गमावावा लागला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे जगभर सर्व क्रीडा स्पर्धा रद्द कऱण्यात आल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयनं भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकाही रद्द केली होती. आता त्याबद्दल नवीन अपडेट समोर आले आहेत. बॉलिवूड गायिका कनिका कपूर ज्या हॉटेलमध्ये होती त्याच ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचा संघही वास्तव्याला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही कोरोनाचा धोका होता. या क्रिकेटपटूंच्या आरोग्याची माहिती आता सांगण्यात आली आहे. भारतातून परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन कऱण्यात आलं होतं. कनिका कपूरला कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्याकाळात तिनं अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याचवेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. यातील दुसरा सामना लखनऊमध्ये होणार होता. त्यासाठी संघ लखनऊमध्ये  ज्या हॉटेलात राहिला होता त्याच हॉटेलमध्ये कनिका कपूरही होती. त्यामुळे क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण होण्याची शंका व्यक्त केली जात होती. हे वाचा : 5 दिग्गज खेळाडूंच्या करिअरवर Coronavirus चे संकट, घ्यावी लागणार निवृत्ती! कोरोनामुळे भारत - आफ्रिका मालिका रद्द झाली. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मायदेशी परतल्यानंतर त्यांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवलं होतं. आता 14 दिवसांनंतर त्यांच्या तब्येतीची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. हे वाचा : सरकारने रेशन नाकारलेल्या पाकमधील हिंदूंसाठी आफ्रिदी आला धावून, केलं अन्नदान दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉक्टर शोएब मांजरा यांनी सांगितलं की, ज्या खेळाडूंची टेस्ट केली होती त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे आफ्रिकेतही दोन आठवड्याचा लॉकडाउन आहे. हे वाचा : 'माझीसुद्धा ड्युटी लावा, मला कोरोनाशी लढायचं आहे', वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket

    पुढील बातम्या