लॉकडाउनमध्ये खेळाडूची 'सेक्स पार्टी', कॉलगर्लना बोलावलं घरी

लॉकडाउनमध्ये खेळाडूची 'सेक्स पार्टी', कॉलगर्लना बोलावलं घरी

जगभरात अनेक देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन केलं आहे. असं असतानाही एका दिग्गज खेळाडूने घरी पार्टी केल्याचं समोर आलं आहे.ो

  • Share this:

मँचेस्टर, 07 एप्रिल : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असून त्याला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. मात्र तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत. आता इंग्लंडच्या एका खेळाडूनेच लॉकडाउनचं उल्लंघन केलं आहे. मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू काइल वॉकर याच्यावर लॉकडाउनचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई होऊ शकते.  ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 5 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

इंग्लंडचा फुटबॉलपटू काइल वॉकरने गेल्या आठवड्यात घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात त्यानं दोन कॉलगर्लना बोलावलं होतं. असं केल्यामुळं त्यानं सरकारने घातलेल्या नियमांचं उल्लंघन केलं. याबद्दल काइलनं माफीही मागितली. दरम्यान, या प्रकारामुळे क्लब मँचेस्टर सिटीसुद्धा काइलवर नाराज झाला आहे. आता क्लबकडूनही त्याच्यावर कारवाई होणार आहे.

काइलनं म्हटलं की, गेल्या आठवड्यात मी जे काही केलं त्यासाठी जाहीरपणे माफी मागतो. मला माहीती आहे की मी फुटबॉलपटू म्हणून आदर्श आहे आणि माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. झाल्या प्रकाराबद्दल मी कुटुंबिय, मित्र, फुटबॉल क्लब आणि समर्थक आणि जनतेची माफी मागतो.

घरी झालेल्या पार्टीमध्ये दोन कॉलगर्ल साडेदहाच्या सुमारास आल्या होत्या असं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. काइलनं त्याची ओळख लपवण्याचाही प्रयत्न केला. लॉकडाउनचं उल्लंघन करणारा काइल पहिलाच खेळाडू नाही. त्याच्याआधी अॅस्टन विलाचा कर्णधार जॅक ग्रीलिशनंही असंच केलं होतं.

हे वाचा : कोरोनाच्या लढ्यात पाकला अशी घ्यावी लागली जसप्रीत बुमराहची मदत

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 46 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे देशात तीन आठवड्यांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

हे वाचा : गोल्फपटू नातवाने कोरोनाशी लढ्यात केलेल्या मदतीनंतर आजी रडली; म्हणाली...

First published: April 7, 2020, 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading