...तर IPL नक्की होईल, रोहित शर्माचे मोठं वक्तव्य

...तर IPL नक्की होईल, रोहित शर्माचे मोठं वक्तव्य

इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनसोबत इंस्टाग्रामवर केलेल्या चॅटमध्ये रोहित शर्माने आयपीएलच्या शक्यतेबाबत विधान केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाव्हायरसचा धोका भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीगचा 13वा हंगाम रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, त्यामुळं आयपीएल रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने वेगळे मत व्यक्त केले आहे. खरं तर रोहित शर्माचा असा विश्वास आहे की, इंडियन प्रीमिअर लीग होऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चारवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

परिस्थिती सुधारली तर IPL होईल

इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनसोबत इंस्टाग्रामवर केलेल्या चॅटमध्ये रोहित शर्माने आयपीएलच्या शक्यतेबाबत विधान केले. यंदा आयपीएल आयोजित करता येईल का, असे रोहितला विचारले असता त्याने "काही दिवसांनी परिस्थिती नीट झाल्यास याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळं स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते", असे सांगितले.

पत्नीला कोरोनाचा धोका, सचिनच्या नावाने पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी -20 मालिकेत टीम इंडियाच्या विजयात रोहितचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मात्र दुखापतीमुळे तो वनडे आणि कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. आता रोहित फिट झाला असून आयपीएलमधून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.

या संघांनी जिंकले आहे आयपीएल

आयपीएलच्या तेराव्य हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार होता, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 मोसमातील सर्वात यशस्वी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात चार वेळा जेतेपद जिंकणार्‍या मुंबई इंडियन्सचा आहे. तर, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दोन तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद डेक्कन चार्जर्सने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.

घरातच थांबा! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पोलिसांनी वापरला धोनीचा वेदना देणारा फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2020 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading