स्पोर्ट्स

  • associate partner

कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका

कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका

IPL रद्द झाल्यास मुंबई इंडियन्सला बसणार सगळ्यात मोठा फटका, कोट्यवधी रुपये जाणार पाण्यात.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2020) कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलला सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. कारण कोरोनाचा धोका वाढल्यास आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द होऊ शकतो. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यास सर्वच संघाना कोट्यवधीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र यात सगळ्यात जास्त नुकसान होईल ते मुंबई इंडियन्स संघाचे.

आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. आतापर्यंत मुंबईने चारवेळा विजेतेपद जिंकले आहेत. त्यामुळं फक्त यशस्वीच नाही तर मुंबईचा संघ हा सर्वात श्रीमंत संघही आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाआधीच 100 कोटींचे प्रायोजकत्व (sponsorship) मिळवले आहे. मुंबई संघाने मॅरियट बोनवॉय आणि अॅआस्ट्रल पाईप्स हे दोन नवीन प्रायोजक मिळाले आहेत. मात्र आयपीएल रद्द झाल्यास मुंबई इंडियन्सचे प्रायोजकत्वही जाऊ शकते. त्यामुळं त्यांना एका झटक्यात 100 कोटींचा फटका बसू शकतो.

वाचा-...तर IPLचा तेरावा हंगाम होणार रद्द, गांगुलीने दिले संकेत

लिलावात मुंबईने खर्च केले 12 कोटी

आयपीएल 2020साठी डिसेंबर 2019मध्ये लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबईने जास्त महागडे खेळाडू विकत घेतले नसले तरी, 6 खेळाडूंसाठी मुंबईने 11.1 कोटी खर्च केले आहेत. मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या नॅशन कुल्टर नाईलला 8 कोटींना विकत घेतले. तर, ख्रिस लीनला 2 कोटींना विकत घेतले. आयपीएलच्या या लिलावात मुंबईने या दोन खेळाडूंवर सर्वात जास्त पैसे खर्च केले.

वाचा-गांगुलीने तयार केला IPLचा ‘प्लॅन बी’, नव्या वेळापत्रकाप्रमाणे होऊ शकतात सामने

2019मध्ये मुंबईची ब्रॅंड व्हॅल्यू होती 809 कोटी

आयपीएलच्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार मुकोश अंबानी यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सर्वात वरच्या स्थानावर होता. या संघाची ब्राँड व्हॅल्यू 809 कोटी इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी मुंबईचा संघ अव्वल स्थानी राहिला आहे. ब्रॅंड व्हॅल्यूबाबत चेन्नई सुपरकिंग्ज(Chennai Superkings)ला सर्वात अधिक फायदा झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या ब्रॅंड व्हॅल्यूत यंदा 13.1 टक्क्यांनी वाढ झाली होती. चेन्नईची ब्रॅंड व्हॅल्यू आता 732 कोटी इतकी झाली होती. त्यामुळं यंदा आयपीएल रद्द झाल्यास त्याचा फटका सर्वात जास्त या दोन संघाना बसणार आहे.

वाचा-BREAKING: कोरोनामुळे IPL लांबणीवर, 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार

बीसीसीआयला होणार 10 हजार कोटींचे नुकसान

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला सगळ्यात मोठा दणका बसणार आहे. जर या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 10 हजार कोटी रुपयांचा मोठा तोटा होऊ शकेल. क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही रक्कम दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नव्हे तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रायोजकत्व, माध्यम हक्क, फ्रेंचायझी महसूल यांनाही कोट्यावधींचा तोटा होऊ शकतो.

First published: March 15, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या