ज्या गोलंदाजाने विराटला दिली होती धमकी, आता Coronavirus संपवणार करिअर

ज्या गोलंदाजाने विराटला दिली होती धमकी, आता Coronavirus संपवणार करिअर

कोरोनामुळे एकीकडे जगभरातली सर्व क्रिकेट सामने रद्द झाले आहे. आता या व्हायरसमुळे क्रिकेटपटूंचे करिअरही धोक्यात आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : कोरोनाव्हायरसने जगभरात दहशत पसरवली आहे. या व्हायरसने संपूर्ण क्रिकेटविश्वालाही विळखा घातला आहे. त्यामुळे बीसीसीआयसह इतर सर्व क्रिकेट बोर्डाने सर्व सामना रद्द केले आहेत. तर, या विषाणूमुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याचबरोबर इंग्लंडमधील मोठ्या स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. याचा परिणाम काही क्रिकेटपटूंच्या करिअरवर होऊ शकतो.

कोरोनामुळे इंग्लंडचा क्रिकेटपटू गॅरेथ बट्टीने या विषाणूमुळे आपले करिअर धोक्यात आल्याचे म्हटले आहे. काउंटी क्रिकेटचा अनुभवी अष्टपैलू गॅरेथचा असा विश्वास आहे की आता तो पुन्हा कधीही क्रिकेट खेळू शकणार नाही.

वाचा-क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या 'या' गोलंदाजाला कोरोना

इंग्लिश क्रिकेटचा हंगाम हा सप्टेंबरपर्यंत असतो. यात 18 काऊन्टी संघ इंग्लंड फर्स्ट क्लास चॅम्पियनशिप, 50 ओव्हर टूर्नामेंट आणि टी -20 ब्लास्ट अशा तीन मोठ्या स्पर्धांमध्ये खेळतात. मात्र कोरोनामुळे या स्पर्धा यंदा होणार नाहीत असे चिन्ह दिसत आहेत.

वाचा-VIDEO : एलियन नाही हा तर क्रिकेटपटू! कोरोनाबाबत जनजागृतीसाठी वापरला अनोखा फंडा

गॅरेथचा हा शेवटचा हंगाम

जर हा हंगाम रद्द झाला तर बर्‍याच युवा क्रिकेटपटूंना याचा फटका बसेल. 42 वर्षीय गॅरेथचा हा शेवटचा काउंटी हंगाम आहे. कोरोनामुळे गॅरेथची 23 वर्षांची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. गॅरेथचा हा हंगामात खेळण्यासाठी 12 महिन्यांचा करार होता जो सप्टेंबरमध्ये संपेल. ऑफस्पिनर गॅरेथने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की त्याने कदाचित शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. त्याला वाटते की आता परत क्रिकेट खेळू शकणार नाही.

वाचा-लय भारी! कोरोनाला हरवण्यासाठी आता दिग्गज क्रिकेटपटू बनवतोय सॅनिटायझर

भारताविरुद्ध खेळला होता अखेरचा सामना

गॅरेथने 261 प्रथम श्रेणी सामने, 271 लिस्ट अ आणि 171 टी -20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 1 हजार 74 विकेट्स घेत 10 हजार 396 धावा केल्या. तर इंग्लंडसाठी 9 कसोटी, 10 एकदिवसीय आणि एक टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2016मध्ये मोहाली येथे भारताविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळविला. गॅरेथ हा एकमेव गोलंदाज होता ज्याने भारतीय फलंदाजांना थोडा त्रास दिला. पहिल्या इनिंग त्याने 2.93च्या सरासरीने गोलंदाजी केली होती. या सामन्यानंतर गॅरेथने एकदा तरी विराटला बाद करेनच, असे सांगितले होते. मात्र असे घडले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Mar 21, 2020 02:16 PM IST

ताज्या बातम्या