मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेट विश्वात Corona चं सर्वात मोठं थैमान; पाकिस्तानच्या या 10 खेळाडूंना 24 तासांत झाला संसर्ग

क्रिकेट विश्वात Corona चं सर्वात मोठं थैमान; पाकिस्तानच्या या 10 खेळाडूंना 24 तासांत झाला संसर्ग

इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना COVID-19 चा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.

इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना COVID-19 चा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.

इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना COVID-19 चा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.

  नवी दिल्ली, 22 जून : क्रिकेट विश्वात Coronavirus घुसल्याची सर्वात खळबळजनक बातमी पाकिस्तानातून आली आहे. इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना COVID-19 चा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.

  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातले 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 28 जूनला पाकिस्तानचा क्रिकेट संघ कसोटी आणि T20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वीच या कोरोना हाहाकाराची बातमी आली आहे.

  संघातल्या 10 जणांना कोरोनाची लागण झालेली असली, तरी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाकिस्तानचा संघ इंग्लंडला जाणारच असं पाक क्रिकेट बोर्डाने (PCB) स्पष्ट केलं. मोहम्मद रिझवान याच्याखेरीज इतर सर्व खेळाडू हे दुसऱ्या चॉइसचे खेळाडू आहेत. त्यामुळे दौऱा रद्द होणार नसल्याचं PCB चे अध्यक्ष वासीम खान यांनी सांगितलं.

  आता हे सगळे खेळाडू आयसोलेशनमध्ये ठेवले आहेत. 25 जूनला पुन्हा या सर्वांची चाचणी होईल आणि त्यांच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंतिम संघाची घोषणा होईल, असं खान यांनी सांगितलं.

  नंबर वन टेनिस स्टारला झाला Corona; बायकोही पॉझिटिव्ह

  पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खान, वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि 19 वर्षीय फलंदाज हैदर अली यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कालच स्पष्ट झालं होतं. त्यात 7 जणांची भर पडली आहे.

  या 10 जणांना झाला कोरोना

  वाहिब रियाझ

  मोहम्मद हफीज

  फकर जमान

  मोहम्मद रिझवान

  कासिफ भट्टी

  मोहम्मद हसनैन

  इम्रान खान

  मलंग अली - फिजिओ/ मसाजिस्ट

  याशिवाय काल तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

  शादाब खान

  हरिस रौफ

  हैदर अली

  गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले; सायबर विभागाकडून नियमावली जारी

  पीसीबीने सांगितलं की, खेळाडूंमध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत, परंतु रावळपिंडी येथे चाचण्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आलं.

  रविवारी पाकिस्तान संघ इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोरोना तपासणी करण्यात आली. पाकिस्तानने इंग्लंड दौर्‍यासाठी 29 सदस्यीय संघाची निवड केली आहे.

  सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दौरा करणाऱ्यांची चाचणी करणं अनिवार्य आहे. यामध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात आणि दौरा करण्यापासून परावृत्त केलं जातं.

  संकलन, संपादन - अरुंधती

  First published:

  Tags: Coronavirus, Pakistan