• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रिकेट मालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव! एकाला लागण, 7 जणांना धोका

क्रिकेट मालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव! एकाला लागण, 7 जणांना धोका

गेल्या दोन वर्षांपासून जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) क्रिकेटला मोठा फटका बसला आहे. अनेक मालिका कोरोनामुळे स्थगित कराव्या लागल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: गेल्या दोन वर्षांपासून जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) क्रिकेटला मोठा फटका बसला आहे. अनेक मालिका कोरोनामुळे स्थगित कराव्या लागल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनममध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धा तातडीने स्थगित करावी लागली होती. आता या स्पर्धेचा उत्तरार्ध सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) या मालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या दोन टीममध्ये 3 सामन्यांची टी 20 मालिका नुकतीच झाली. या मालिकेतील मॅच रेफ्री फिल व्हिटीकेस (Phil Whitticase) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना देखील कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे या सर्वांना आता 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहवे लागेल. या 7 जणांमध्ये सामना अधिकारी तसं एंटी करप्शन युनिटच्या सदस्यांचा समावेश आहे. यापैकी 5 जणांचा वन-डे मालिकेतही समावेश होता. या सर्वांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्यानं वन-डे मालिकेसाठी नव्या अधिकाऱ्यांची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) केली आहे. 29 जूनपासून ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत मायकल गॉफ आणि रिचर्ड कॅटलब्रा हे अंपायर असतील. तर ख्रिस ब्रॉड यांची रेफ्री म्हणून निवड झाली आहे. खेळाडूंना कोणताही धोका नाही दोन्ही टीमचे सर्व खेळाडू सुरक्षित असून कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. वन-डे मालिका नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचं इसीबीने स्पष्ट केले आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेली 3 टी20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 या फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना 26 जून रोजी झाला. IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? वाचा महत्त्वाचे अपडेट विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया देखील सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टेस्ट मॅचची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: