Home /News /sport /

अरे बापरे! चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह निघाला पाकिस्तानचा खेळाडू; तातडीने स्पेशल गाडीने घरी रवानगी

अरे बापरे! चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह निघाला पाकिस्तानचा खेळाडू; तातडीने स्पेशल गाडीने घरी रवानगी

या खेळाडूला स्पेशल कार करुन घरी पाठविण्यात आलं आहे

    नवी दिल्ली, 20 जुलै : पाकिस्तानचे जलद बॉलर हारिस रऊस कोरोना व्हायरसमध्ये अडकला आहे. डाव्या हाताने बॉलिंग करणारा खेळाडू चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत या खेळाडूची पाच वेळा कोरोना चाचणी झाली आहे. ज्यापैकी 4 मध्ये हा खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यापूर्वी झालेल्या टेस्टमध्ये तो निगेटिव्ह आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रऊफ यांची आताची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे वाचा-हार्दिक पांड्याच्या कुशीत प्रेग्नंट नताशा; पाहा क्युट कपलचे FAMILY PHOTO आयसोलेशनमध्ये पाठवलं हारिफ रऊफ (Haris Rauf) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर यांना तातडीने आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे. हारिफ रऊफ यांना लाहौरहून इस्लामाबाद स्पेशल कारने परत पाठविण्यात आलं. 26 वर्षीय जलद गोलंदाज पीसीबीच्या मेडिल पॅनलच्या संपर्कात होते. 10 दिवसांतर हारिफ रऊफ यांची पुन्हा कोरोना चाचणी केली जाईल. लाहौर कलंदर्सचा जलद गोलंदाज असलेल्या हारिफची सलग तीन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. हे वाचा-असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल पाकिस्तानची टीम टी20 विश्वचषक स्पर्धेच्या प्रतीक्षेत होते. मात्र आज आयसीसीच्या बैठकीत टी20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे क्रिकट चाहत्यांसह खेळाडूंचा हिरमोड झाला असला तरी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या