Home /News /sport /

मेस्सीनं जिंकलं मन! पायातून रक्त गळत असतानाही सोडले नाही मैदान, पाहा VIDEO

मेस्सीनं जिंकलं मन! पायातून रक्त गळत असतानाही सोडले नाही मैदान, पाहा VIDEO

जगातील बेस्ट फुटबॉलपटू आणि अर्जेंटीनाचा कॅप्टन लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याने पुन्हा एकदा झुंजार खेळानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

    मुंबई, 8 जुलै: जगातील बेस्ट फुटबॉलपटू आणि अर्जेंटीनाचा कॅप्टन लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याने पुन्हा एकदा झुंजार खेळानं सर्वांची मनं जिंकली आहेत. कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेतील (Copa America 2021) सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनानं कोलंबियाचा (Argentina vs Columbia) पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव केला. या विजयात मेस्सीच्या जिद्दी खेळाचे मोलाचे योगदान होते. या खेळाच्या दरम्यान मेस्सीच्या पायातून रक्त पडत होते. पायाचा त्रास होत असतानाही मेस्सी थांबला नाही. त्या अर्जेंटीना जिंकण्यासाठी अक्षरश: जीवाची बाजी लावली. अन्य एखादा फुटबॉलपटू असता तर त्याने या त्रासामुळे मैदान सोडले असते. पण, मेस्सीनं अर्जेंटीनाला फायनलमध्ये पोहचवल्यावरच विश्रांती घेतली. मेस्सीच्या या खेळाचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. या खेळाबद्दल फुटबॉल फॅन्सनी त्याला सलाम केला आहे. मेस्सीच्या पासवर गोल या सेमी फायनलमधील पहिला गोल 7 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या एल.मार्टिनेजनं केला होता. मेस्सीनं दिलेल्या पासवरच हा गोल झाला. दुसऱ्या हाफममध्ये 61 व्या मिनिटाला कोलंबियाने बरोबरी साधली. दुसऱ्या हाफममध्येच 55 व्या मिनिटाला कोलंबियाच्या फ्रेंक फेब्राने मेस्सीच्या ताब्यातील बॉल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात पायावर जोरदार किक मारली. त्यामुळे अर्जेंटीनाच्या कॅप्टनच्या पायातून रक्त येऊ लागले. Sourav Ganguly Birthday: गांगुलीनं पळून जाऊन केलं होतं लग्न, फिल्मी आहे दादाची Love Story अर्जेंटीनाची फायनलमध्ये लढत ब्राझीलशी आहे. अर्जेंटीनानं आजवर 9 वेळा ही स्पर्धा जिंकली असून ब्राझीलनं 6 वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Football, Sports, Video viral

    पुढील बातम्या