दिग्गज फलंदाजाचं निधन; 20 शतकं आणि 14 हजार धावांची केली होती कामगिरी

दिग्गज फलंदाजाचं निधन; 20 शतकं आणि 14 हजार धावांची केली होती कामगिरी

त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलेलं नाही. पण ब्रिटीश मीडिया रिपोर्टनुसार, ते काही दिवसांपासून आजारी होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : इंग्लिश काउंटी क्रिकेटमधलं (English County cricket) मोठं नाव ग्रॅहम काउड्रे  (GrahamCowdrey) यांचं 56 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलेलं नाही. पण ब्रिटीश मीडिया रिपोर्टनुसार, ते काही दिवसांपासून आजारी होते. काउड्रे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नव्हतं, पण ब्रिटनमध्ये प्रतिष्ठेचं मानल्या जाणाऱ्या काउंटी क्रिकेटचा ते भाग होते. केंट काउंटीच्या टीममधून ते खेळायचे आणि बरीच लोकप्रियता त्यांनी मिळवली होती.

ग्रॅहम काउड्रे मधल्या फळीतले फलंदाज म्हणून अधिक सामने खेळले. केंटच्या संघासाठी 14000 पेक्षा अधिक धावा त्यांनी कुटल्या होत्या. 20 शतकं त्यांच्या नावावर आहेत.  इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट हा फर्स्ट क्लास क्रिकेटचा महत्त्वाचा भाग आहे आणि जगभरातले क्रिकेट प्रेमी काउंटी सामने पाहात असतात. काउड्रे या प्रकारात प्रसिद्ध नाव होतं. त्यांनी केंटसाठी 179 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये 8858 रन आणि 17 शतकं ठोकली. ग्रॅहम काउड्रे यांचे वडील लॉर्ड काउड्रे आणि भाऊ ख्रिस काउड्रे यांनी इंग्लंडचं कर्णधारपद भूषवलं होतं. ग्रॅहम यांचे आजोबासुद्धा क्रिकेटपटू होते.

अनेक क्रिकेटपटूंना धक्का

काउड्रे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे अनेक क्रिकेटपटूंना धक्क बसला आहे. अनेक मित्रांनी याबद्दल धक्का बसल्याचं सांगितलं आहे. मॅथ्यू फ्लेमिंग कर्णधार असताना त्यांच्या संघात ग्रॅहम काउड्रे होते. फ्लेमिंग म्हणाले, "काउड्रे गेम चेंजर होता. मधल्या फळीत येऊनही फटकेबाजी करत तो आक्रमक खेळी करत असे. त्याच्यामुळे आम्ही अनेक मॅच जिंकलो होतो. त्याच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे." ग्रॅहम काउड्रे धडाकेबाज फलंदाज तर होतेच पण उत्तम फील्डर होते. त्यांचं क्षेत्ररक्षण बघण्यासारखं असे. ग्रॅहम यांच्या मागे मायकेल, ग्रेस आणि अलेक्झांडर अशी 3 मुलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 11, 2020, 10:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या