मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट-गांगुली वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, दादाच्या रिएक्शनने वाढवला सस्पेन्स!

विराट-गांगुली वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, दादाच्या रिएक्शनने वाढवला सस्पेन्स!

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या, पण हा वाद रोहितसोबतचा नसून सौरव गांगुलीसोबतचा (Virat Kohli Sourav Ganguly Controversy) आहे का?

पुढे वाचा ...

कोलकाता, 15 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या, पण विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हा वाद रोहितसोबतचा नसून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसोबतचा (Virat Kohli Sourav Ganguly Controversy) आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाला विराट?

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.

गांगुलीच्या प्रतिक्रियेने वाढवला सस्पेन्स

विराट कोहलीने दिलेल्या या उत्तरानंतर सौरव गांगुलीला पत्रकारांनी याबाबत विचारलं, तेव्हा गांगुली नो कमेंट म्हणत निघून गेला. गांगुलीच्या या उत्तरामुळे या प्रकरणातला सस्पेन्स अजून वाढला आहे.

रोहितसोबत कोणताही वाद नाही

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विराट कोहलीने आपल्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण विराटने दिलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी विराटने स्वत:हून सोडली, पण त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि रोहितला ही जबाबदारी देण्यात आली. यानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली वनडे सीरिज खेळणार नसल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना व्हायच्या आधी रोहित शर्माला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला. या सगळ्या घटनांमुळे विराट-रोहित यांच्यात वाद असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या.

विराट कोहलीने मात्र आपण वनडे सीरिजसाठी आधीही उपलब्ध होतो आणि आताही आहोत. ज्यांनी खोटं लिहिलं त्यांना या गोष्टी विचारल्या पाहिजेत, असं वक्तव्य विराटने केलं.

'माझ्या आणि रोहित शर्मामध्ये काहीही वाद नाही, मागच्या दोन वर्षांपासून मी हे सांगून थकलो आहे, वैतागलो आहे.' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. सोबतच माझी कोणतीही हरकत किंवा निर्णय टीमला खाली दाखवणारा नसेल. टीमला योग्य दिशेने घेऊन जाणं, हीच माझी जबाबदारी असेल. रोहित एक सक्षम कर्णधार आहे, तसंच राहुल द्रविड उत्कृष्ट मॅनेजर आहे. वनडे आणि टी-20 मध्ये माझं शंभर टक्के समर्थन त्यांना आहे, असं विराट म्हणाला.

First published:

Tags: Sourav ganguly, Team india, Virat kohli