Home /News /sport /

...जेव्हा आमने-सामने आले क्रिकेटमधील दिग्गज, 2020 मधील सर्वात मोठे 5 वाद

...जेव्हा आमने-सामने आले क्रिकेटमधील दिग्गज, 2020 मधील सर्वात मोठे 5 वाद

रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.

रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.

यंदाही क्रिकेटमध्ये वादाने पाठ सोडली नसून या वर्षी देखील अनेक वाद झाले आहेत.

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात खूप कमी क्रिकेट खेळले गेलं आहे. परंतु या काळात देखील क्रिकेटमध्ये वादाने पाठ सोडली नसून या वर्षी देखील अनेक वाद झाले आहेत. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली, अशा काही वादग्रस्त घटनांविषयी माहिती जाणून घेऊयात. 1. आयपीएलमध्ये (IPL) सुरुवातीच्या काही मॅचमध्ये विराट कोहलीला(Virat Kohli) सूर गवसत नव्हता. यावेळी कॉमेंट्री करताना विराट कोहली(Virat Kohli) याच्यावर सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. कोहलीच्या कॅच सुटण्यावर गावस्कर(Sunil Gvaskar) यांनी टीका करताना विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त पत्नी अनुष्काबरोबरच सराव केला, असं म्हटलं होतं. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) हिने गावस्कर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनीदेखील तिला प्रत्युतर दिलं होतं. यावर सोशल मीडियावर मोठा गदारोळ देखील झाला होता. 2. यावर्षी चेन्नई सुपर किंग्स(CSK) आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये देखील पोहोचू शकली नाही. त्याचबरोबर त्यांच्या मुख्य प्लेअर सुरेश रैना(Suresh Raina) याने आयपीएलमधून माघार घेतली होती. रैना टीमबरोबर दुबईला गेला, पण लगेच तो वैयक्तिक कारण देत भारतात परतला. त्याने आयपीएलमधून माघार घेण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे म्हटले असले तरीदेखील त्याचे धोनीबरोबरील(MSD) संबंध खराब झाले असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 3. बांगलादेशचा प्लेअर मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्लेअरवर हात उचलल्याची घटना पाहायला मिळाली आहे. बांगलादेशमधील बंगबंधू टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॅच पकडत असताना टीममधील नसूम अहमद या प्लेअरबरोबर त्याची कॅच पकडताना धडक झाली असती. त्यामुळे चिडलेल्या रहीम याने त्याला मारण्यासाठी हात उगारला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आणि टीका झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. 4. इंडियन टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या टी-20 सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजा(Ravindra jadeja) याच्याजागी युजवेंद्र चहल(Yujvendra Chahal) याला खेळवण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. बॅटिंग करताना रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर बॉल लागल्यानं त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग केली नाही. त्याच्या जागी चहल ग्राऊंडमध्ये आला. नवीन नियमांनुसार बदली खेळाडू बॉलिंग आणि बॅटिंग करू शकत असल्यानं चहलने या मॅचमध्ये बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला चांगले धक्के दिले. त्यामुळे चिडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कोचने आणि कॅप्टनने यावर प्रश्न उपस्थित करत नियमांचे पालन न केल्याचा आरोप केला. 5. रोहित शर्मा(Rohit Sharma) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून पुढील टेस्ट मॅचमध्ये तो इंडियन टीममध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. परंतु आयपीएलमध्ये जखमी झाल्यानं त्याला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं नव्हतं. आयपीएलमध्ये(IPL) तो जखमी झाल्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी -20 सिरीजमध्ये खेळला नव्हता. परंतु आयपीएलमध्ये जखमी झाल्यानंतर काही सामन्यात विश्रांतीनंतर तो पुन्हा खेळला. त्यामुळं तो जखमी असताना देखील आयपीएल खेळाला, परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Cricket, Cricket news

पुढील बातम्या