News18 Lokmat

झहीर खान-राहुल द्रविडचा करार सीओएने थांबवला

झहीर खानला बॉलिंग कोच आणि राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर टीमसाठी कोच म्हणून निवडले. त्यांच्या कोच पदासाठी जो कॉन्ट्रॅक्ट तयार केला होता त्या कॉन्ट्रॅक्टवर आता सीओए कमिटीने स्थगिती दिलीये.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 08:42 PM IST

झहीर खान-राहुल द्रविडचा करार सीओएने थांबवला

14 जुलै : भारतीय क्रिकेट विश्वात चाललेला वाद थांबता थांबत नाहीये. क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीने रवी शास्त्री यांना हेड कोच तर झहीर खानला बॉलिंग कोच आणि राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर टीमसाठी कोच म्हणून निवडले. त्यांच्या कोच पदासाठी जो कॉन्ट्रॅक्ट तयार केला होता त्या कॉन्ट्रॅक्टवर आता सीओए कमिटीने स्थगिती दिलीये.

क्रिकेट अ्रॅडव्हायजरी कमिटीने मागच्या आठवड्यात हेड कोच आणि सबॉर्डिनेट कोचेसची निवड केली होती. पण त्यांना कुठलेही कॉन्ट्रॅक्ट दिले नव्हते. गुरूवारी हा कॉन्ट्रॅक्ट बीसीसीआय तयार करत असताना सीओएने तो ड्राफ्ट करण्यास परवानगी दिली नाही. आता या कॉन्ट्रॅक्टवर शेवटचा निर्णय सीओएच घेईल.

बीसीसीआयने क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या माहितीनुसार, रवी शास्त्रीने स्पोर्ट स्टाफला दिलेल्या एका मतावर सीएसीने प्रश्न उपस्थित केलेत. रवी शास्त्रीने असं म्हटलं होतं की, 'बॉलिंग कोचेसवर ते खूश तर आहेत पण त्यांना दोनच्या ऐवजी एकच फूल टाइम कोच हवा होता'. तसंच सहाय्यक कोचेसच्या पगारात काही असमानता नको यायला असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. आता या साऱ्यावर काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी सीओएच्या हातात आहे. त्यासाठी सीओए सचिन,गांगुली लक्ष्मणच आणि शास्त्रीची भेटही घेणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच झहीरच्या पगाराचीही निश्चिती झालं नसल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...