क्रीडा विश्वाची चिंता वाढली; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित झालेला पहिला क्रिकेटर

क्रीडा विश्वाची चिंता वाढली; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित झालेला पहिला क्रिकेटर

ही बाब चिंता वाढवणारी आहे.

  • Share this:

कोलंबो, 14 जानेवारी : श्रीलंकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोविड-19 चा नवीन ‘वॅरिएंट'ने त्यांच्या देशात प्रवेश केला आहे आणि सोबतच त्यांनी पुढे सांगितलं की, इंग्लंडचे क्रिकेटर मोइन अली (Moeen Ali) याची तपासणी केली असता त्यांना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली आहे. मोइल अली कोविडच्या नवीन स्ट्रेनची लागण झालेले पहिले क्रिकेटर आहेत. आणि ही बाब चिंता वाढवणारी आहे. (The first cricketer to be infected by Coronas new strain)

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या दोन कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौर्‍यावर आहे. आरोग्य सेवा उपसंचालक हेमंत हेराथ यांनी बुधवारी सांगितलं की, अली 4 जानेवारीला पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीयसह विविध देशांमधील अनेक देशांतर्गत क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झालेली आहे. विशेषत: दक्षिण आफ्रिका दौर्‍यामध्ये ने पाकिस्तानच्या टीमला कोरोनाचा झटका सहन करावा लागत होता, पण कोविडच्या या नव्या स्ट्रेनमुळे आता पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला त्याची लागण झाली आहे. मार्चच्या मध्यापासून श्रीलंकामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून 50,200 रुग्णांची नोंद झाली असून 247 लोकांचा मृत्यू झाला आहे. 4 ऑक्टोबरपासून सुमारे 47,000 प्रकरणे नोंदली गेली आहेत. (The first cricketer to be infected by Coronas new strain) डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन आणि सिंगापूर या देशांमध्ये ब्रिटनचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे.

हे ही वाचा-IND vs AUS: भाजप खासदाराच्या टीकेवर विहारीचा स्ट्रेट टाईव्ह, सेहवागचा सिक्सर!

मुख्य रोगशास्त्रज्ञ सुदथ समरवीरा म्हणाले की, यूकेचा वॅरिएंट अतिशय वेगाने पसरतो. ज्यामुळे श्रीलंकेत अधिक घटना समोर आल्या आहे. ते म्हणाले की, म्हणून आम्ही काटेकोरपणे विविध प्रक्रियेवर जोर देत आहोत. (The first cricketer to be infected by Coronas new strain) मेच्या मध्यापासून देशात पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

Published by: Meenal Gangurde
First published: January 14, 2021, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading