Commonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण

Commonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण

Commonwealth Table Tenis Championship स्पर्धेत भारताने सर्व प्रकारात सुवर्णपदकांसह एकूण 15 पदके पटकावली.

  • Share this:

कटक, 23 जुलै : Commonwealth Table Tenis Championship स्पर्धेत सर्व प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावलं. सोमवारी झालेल्या पुरुष आणि महिला एकेरीत भारताच्या हरमीत देसाई आणि आहिका मुखर्जी यांनी सुवर्ण पटकावलं. विशेष म्हणजे दोन्ही गटात अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूच आमने-सामने होते.

पुरुषांच्या एकेरीत हरमीतने जी. साथियानचा पराभव केला. पहिल्या दोन गेममधील पिछाडी भरून काढत हरमीतने आघाडी घेत विजय मिळवला. महिला गटात आहिका मुखर्जीने एकतर्फी विजय मिळवला. तिने राष्ट्रीय विजेती मधुरिका पाटकरचा पराभव केला. आहिकानं हे पहिलंच सुवर्ण पदक पटकावलं.

पुरुष दुहेरीत भारताच्याच अँथोनी अमलराज-मानव ठक्कर यांनी साथियान-शरथ कमल यांचा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर पुढच्या तीन सेट मध्ये पुनरागमन करत विजय मिळवला. तर महिला दुहेरीमध्ये पूजा सहस्रबुद्धे-कृत्विका सिन्हा राय यांनी बाजी मारली. श्रीका अकुला-मौसमा पॉल यांचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत भारताने सर्वच प्रकारात म्हणजेच सातही सुवर्णपदकं पटकावली. याशिवाय 5 रौप्य, 3 कांस्य पदके भारताच्या नावावर झाली. या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडने 2 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंगापूरने सहा कांस्य पदके पटकावली. मलेशिया आणि नायजेरियाने प्रत्येकी एक कांस्य पदक जिंकले.

SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ

Published by: Suraj Yadav
First published: July 23, 2019, 8:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading